petrol diesel rate down : दिल्लीत डिझेल सर्वात स्वस्त तर जयपूरमध्ये पेट्रोल आणि डिझेलही महाग | पुढारी

petrol diesel rate down : दिल्लीत डिझेल सर्वात स्वस्त तर जयपूरमध्ये पेट्रोल आणि डिझेलही महाग

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात केलेल्या कपाती पाठोपाठ विविध राज्यांनी त्यांचा व्हॅट कमी केल्यामुळे देशभरात इंधन स्वस्त झाले आहे. त्यातही दिल्लीमध्ये डिझेल सर्वाधिक स्वस्त किंमतीत मिळत आहे. विशेष म्हणजे दिल्लीपासून जवळच असलेल्या राजस्थानमधील जयपूरमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग दराने विकले जात आहे. (petrol diesel rate down)

दिवाळीचा सण तोंडावर असताना केंद्र सरकारकडून इंधनावरील उत्पादन शुल्कात घसघशीत कपात करण्यात आली होती. त्यापाठोपाठ बहुतांश भाजपशासित राज्यांनी त्यांच्या व्हॅट दरात मोठी कपात केली होती. उत्पादन शुल्क कपातीनंतर सलग तिसऱ्या दिवशी तेल कंपन्याकडून शनिवारी पेट्रोल-डिझेल दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

petrol diesel rate down : महाराष्ट्र सरकारने व्हॅटमध्ये अद्याप कपात केलेली नाही

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 103.97 रुपयांवर स्थिर असून मुंबईत हेच दर 109.98 रुपयांवर आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने व्हॅटमध्ये अद्याप कपात केलेली नाही. महानगरांचा विचार केला तर चेन्नईमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त तर दिल्लीत डिझेल सर्वात स्वस्त आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपयांवर आहे तर डिझेल 91.43 रुपयांवर आहे.

संबंधित बातम्या

दिल्लीत डिझेल 86.67 रुपयांवर स्थिर असून मुंबईत हेच दर 94.14 रुपयांवर आहेत. जयपूरमध्ये पेट्रोल सर्वात महाग म्हणजे 111.10 रुपयाने विकले जात असून त्यापाठोपाठ मध्य प्रदेशात ते 107.23 आणि बिहारमध्ये 105.90 रुपये दराने विकले जात आहे. जयपूरमध्ये डिझेल 95.71 रुपयांना विकले जात असून आंध्र प्रदेशात हे दर 95.18 तर मुंबईत 94.14 रुपये इतके आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button