

चार ते पाच जणांच्या टोळीने तरुणाची निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री मनमाड रेल्वे स्थानकावर घडली. शिवम पवार (रा. उसवड ता. चांदवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवमला तीन बहिणी असून भाऊबाजीच्या दिवशी त्याचा खून झाल्याने त्याच्या कुटुंबीयावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिस तपास करीत आहेत.
रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी होती. त्यावेळी 4 ते 5 तरुणांनी शिवम याच्यावर धारदार हत्याराने 5 ते 6 वार केले. ताे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. हल्लेखार नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे पसार झाले. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समाेर येत आहे. शिवम पवार याच्यावर हल्ला झाला तेव्हा एक मुलगीदेखील त्या ठिकाणी होती. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.