bigg boss मराठी : मीनल म्हणते, खूप फ्लिप मारतात त्या | पुढारी

bigg boss मराठी : मीनल म्हणते, खूप फ्लिप मारतात त्या

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या  ( bigg boss मराठी ) घरात “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे घरातील समीकरण पूर्णपणे बदलल्याचे दिसून येते आहे. मीनलवर विशाल, सोनाली आणि विकास नाराज आहेत. तर दुसरीकडे उत्कर्ष, जय, मीरा आणि गायत्रीचा ग्रुप तुटला आहे असे दिसून येते आहे. कारण गायत्रीने यांच्यासोबत खेळण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मीरा म्हणाली, मी उत्कर्षवर कसं विश्वास ठेवणार. आता कालपासून स्नेहा आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये देखील काहीतरी बिनसल्याचे दिसून येत आहे. काल दोघींमध्ये बरीच वादावादी झाली. आज एकीकडे तृप्ती देसाई, मीरा आणि गायत्रीला स्नेहाबद्दल तर दुसरीकडे स्नेहा, तृप्ती देसाईंबद्दल मीनलशी बोलताना दिसणार आहे.

तृप्ती देसाई, मीरा आणि गायत्रीला ते सगळेच स्वत:साठी खेळत असल्याचे सांगताना दिसणार आहे. मीरा त्यावर म्हणते, ‘ते सगळ्यात आधी स्वत:चा विचार करतात.’ तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘मला माहिती नव्हतं पहिले नावं कोणाचे. आपलं देखील काहीही ठरलेलं नव्हतं.’ स्नेहा म्हणते, ‘नक्की ताई ?. मी म्हंटल तुम्ही कॅप्टन आहात, काल पण होती. ती कॅप्टन. मग कशाला. दुसर्‍याला संधी मिळालीच पाहिजे.’

दुसरीकडे स्नेहा मीनलला सांगणार आहे, विरुध्द टीममध्ये असूनसुध्दा आम्ही त्यादिवशी रात्री गप्पा मारत होतो. दुसर्‍या दिवशी या मीरा – गायत्रीला स्नेहासमोर काही बोलू नका. ती तिकडे त्यांच्या टीममध्ये जाऊन सांगेल. यावर मी असं कधी करत नाही. गेमच्या गोष्ट मी कशी सांगणार, असेही ती म्हणाली. मीनल त्यावर म्हणाली, खूप फ्लिप मारतात त्या.” यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बघत राहा बिग बॉस मराठी ( bigg boss मराठी ) सीझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button