bbm- 3 : बिग बॉस घरामध्ये रंगणार “दिवा कॅप्टन्सीचा” हे कार्य! | पुढारी

bbm- 3 : बिग बॉस घरामध्ये रंगणार “दिवा कॅप्टन्सीचा” हे कार्य!

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या (bbm) घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि दिवाळी साजरी करायलाच हवी असे सांगितले. कॅप्टन पदाचे उमेदवार कोण असतील याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि याच दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी संध्येला याचा निकाल आगळ्यावेगळ्या पध्दतीने लागणार असे त्यांनी जाहीर केले. दिवाळीच्या निमित्ताने एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. (bbm)

घरामध्ये दिवाळी एकदम धूमधडाक्यात साजरी झाली. अवधूत गुप्ते यांच्या उपस्थितीने दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम विशेष ठरला यात शंका नाही. आणि याच कार्यक्रमात घराला मिळाले कॅप्टन्सीचे दोन उमेदवार गायत्री आणि मीरा. आज गायत्री आणि मीरामध्ये रंगणार आहे “दिवा कॅप्टन्सीचा” हे कार्य.

बघुया घरातील सदस्य कोणाला सपोर्ट करणार? आणि कोण बनणार घराचा नवा कॅप्टन मीरा की गायत्री? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button