सातारा दिवाळी : लखलख चंदेरी, सोनेरी तेजाची सारी दुनिया | पुढारी

सातारा दिवाळी : लखलख चंदेरी, सोनेरी तेजाची सारी दुनिया

सातारा; पुढारी वृत्तसेवा: लक्ष- लक्ष दिव्यांचा प्रकाश, विविधरंगी आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या, फटाक्यांची जोरदार आतषबाजी अशा मंगलमय वातावरणात साताऱ्यात दीपोत्सवाला (सातारा दिवाळी ) उधाण आलं. गुरुवारी ( दि. ४) रोजी परिसरात जल्लोषाचे स्वरूप आले होते.

साताऱ्यात काल सायंकाळनंतर अक्षरश: चंदेरी, सोनेरी तेजाची दुनियाच अवतरली. फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत संपूर्ण सातारा जिल्ह्यातील वातावरणात लक्ष्मीपूजनचा सोहळा (सातारा दिवाळी) पार पडला.अवघ्या शहरभर झालेली फटाक्यांची विविधरंगी आतषबाजी लक्षवेधक ठरली अन् दिवाळीच्या माहोलात अवघी शाहूनगरी न्हावून निघाली.

हेही वाचलंत का?

 

Back to top button