Shilpa Shetty : शिल्पानं राजशी कशासाठी लग्न केलं?; अनिल कपूर म्हणाला... - पुढारी

Shilpa Shetty : शिल्पानं राजशी कशासाठी लग्न केलं?; अनिल कपूर म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणी ६२ दिवस तुरुंगात राहिला. यामुळे शिल्पाचे मोठे नुकसान झाले. शिल्पाने राजसोबत का लग्न केले? याबाबत एका कार्यक्रमात मोठा खुलासा झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शिल्पा शेट्टीने २००९ मध्ये राज कुंद्रा सोबत लग्न केले. दोघांची भेट लंडनमध्ये झाली होती. येथून दोघांच्या मैत्रीची सुरुवात झाली. शिल्पाने राज कुंद्राच्या कुटुंबियाचे मन जिंकण्यास कोणतीही कसर ठेवली नाही.

याबाबत फराह खानने तिच्या ‘बैकबेंचर’ शो मध्ये शिल्पाला, राज कुंद्रा याच्यामध्ये असे काय होते की तू त्याच्यासोबत लग्न केलेस, असा सवाल विचारला. या शो मध्ये शिल्पा सोबत अभिनेता अनिल कपूर उपस्थित होता. या कार्यक्रमादरम्यान फराह खानने शिल्पाला सवाल केला, ”राजने शिटी काय वाजवली होती की पंख पसरले होते. त्याने असे काय केले की तू लग्नासाठी होकार दिलास. यावर शिल्पा काही बोलण्याआधीच फराह खानच्या सवालवर अनिल कपूरने त्यावर मिश्किलपणे कमेंट केली. तो म्हणाला, ”खरे तर राजने पैसे पसरवले होते.” अनिल कपूरच्या या उत्तरावर शिल्पा मोठ्याने हसली. शिल्पा त्यावर म्हणाली की, पैशाशिवाय त्याने प्रेमदेखील व्यक्त केले होते. त्याने माझ्यासमोर हात पसरले होते. त्यावर कोपरखळी मारत अनिल कपूर म्हणाला, प्रेमाशिवाय त्याच्याकडे अमाप पैसादेखील होता.
अनिल कपूरच्या बोलण्यावर फराह खानने सवाल केला की, पण तुमच्याकडे पैस नसताना सुनिताने तुमच्याशी लग्न करण्यास कसा होकार दिला. त्यावर अनिल म्हणाला, ”कारण सुनिताकडे त्यावेळी पैसे होते,”.

असे सांगितले जाते की, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची (Shilpa Shetty) पहिली भेट बिझनेस डीलवरुन झाली होती. पण पहिल्या भेटीनंतर ती नाराज झाली होती. शिल्पाने याबाबत म्हटले होते, ”राजच्या भेटीनंतर मी त्याच्याबाबत माझ्या एका मित्राकडे सवाल केला होता. त्यावर त्याने सांगितले की राज विवाहित आहे. हे एेकून मी खूप अस्वस्थ झाले होते. पण त्यावेळी मला माहित नव्हते की राजचा घटस्फोट होणार आहे. तर राजने शिल्पाशी झालेल्या पहिल्या भेटीनंतर म्हटले होते की, ज्यावेळी मी तिला पाहिले. त्यावेळीच मला मनापासून वाटले होते की शिल्पाला आपली लाइफ पार्टनर बनवले तर मी खूश राहीन.

हे ही वाचा :

Back to top button