Vijay Sethupathi : सेतुपतिचे ‘हे’ ५ चित्रपट पाहिले नाहीत! मग, काय पाहिलं? | पुढारी

Vijay Sethupathi : सेतुपतिचे 'हे' ५ चित्रपट पाहिले नाहीत! मग, काय पाहिलं?

पुढारी ऑनलाईन

साउथ स्टार विजय सेतुपति (Vijay Sethupathi) ची चर्चा सध्या होत आहे. मास्टर (Master) या चित्रपटातील धाकड परफॉर्मन्सनंतर विजय सेतुपतिची क्रेझ भारतात निर्माण झाली. या चित्रपटाने तमिळ चित्रपटातील अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. थलापति विजय (Thalapathy Vijay) सोबत सेतुपतिची जबरदस्त टक्कर पाहून सिनेप्रेमी वेडे झाले. कोरोना काळात हा चित्रपट रिलीज झाला. (Vijay Sethupathi)

सिनेमागृहात ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी होती. तरीदेखील मास्टरने २५० कोटींहून अधिक कमाई केली. विजय सेतुपतिचा अभिनय पाहिला तर तुम्हाला समझेल की, उगाचं दक्षिणेत विजय सेतुपतिचं इतकं मोठं नाव नाहीये. त्याच्या चित्रपटासाठी लोक अक्षरश: वेडे होतात. पाहा त्याचे हे सुपरडुपर पाच चित्रपट. सुट्ट्यांमध्ये हे चित्रपट पाहायला हरकत नाही.

विक्रम वेधा (Vikram Vedha)

आर माधवनसोबत विजय सेतुपतिच्या या चित्रपटाने तमिळ सिनेजगताला हालवून सोडले. या चित्रपटाचे कौतुक आजदेखील होते. यानंतर आता हिंदी चित्रपट निर्मात्यांनीदेखील हा चित्रपट रीक्रिएट करण्याच्या तयारीत आहेत.

सुपर डीलक्स (Super Deluxe)

तमिळ चित्रपट सुपर डीलक्समध्ये विजय सेतुपति यांनी ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये विजय सेतुपतिने एका महिलेच्या आत लपलेल्या वडिलांच्या भावनांनी प्रेक्षकांना रडण्यास भाग पाडले. हा चित्रपट लोकप्रिय ठरला. लोक विजय सेतुपतिच्या अभिनयावर फिदा झाले झाले होते.

मास्टर (Master)

रिलीज चित्रपट मास्टरमध्ये थलापति विजय समोर विजय सेतुपतिच्या हुंकारवप सिनेमागृहांमध्ये शिट्ट्या वाजवण्यास भाग पाडले. या चित्रपटामध्ये थलापति विजय एक गँगस्टर भवानीच्या भूमिकेत होता. त्याचा सामना एक मद्यपी मगर कडक मास्टरशी होतो. तमिळ अदाकारा तृषा कृष्णननसोबत थलापति विजयचा ९६ एक क्लासिक रोमँटिक चित्रपट होता. या चित्रपटाचे अद्यापपर्यंत तोंडभरून कौतुक होते. या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा तेलुगुमध्येही रीमेक करण्यात आला होता.

सेतुपति (Sethupathi)

या चित्रपटामध्ये विजय सेतुपतिने एका अशा इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती, जो खलनायकाच्या जाळ्यात अडकतो. सेतुपति स्वत:ला आणि परिवाराला वाचवण्यासाठी संघर्ष करतो. हा एक क्लासिक चित्रपट आहे. सेतुपतिचे धाकड डायलॉग्स प्रेक्षकांची मने जिंकून घेतात.

तुम्ही सेतुपतिचे फॅन आहात का? तुम्ही सेतुपतिचे चित्रपट पाहिले आहेत का? वरीलपैकी आपण जर चित्रपट पाहिले नसतील तर हे चित्रपट नक्की पाहा.

हेही वाचलं का?

Back to top button