कोण आहे नीथा शेट्टी? तिला पाहून भल्याभल्यांच्या हृदयात वाजली शिट्टी

कोण आहे नीथा शेट्टी? तिला पाहून भल्याभल्यांच्या हृदयात वाजली शिट्टी
Published on
Updated on

बिग बॉस मराठी ३ च्या घरात नीथा शेट्टी या अभिनेत्रीची एंट्री झाली. आणि तिला पाहून सर्वांची बोलती बंद झाली. तिचं सौंदर्य, तिच्या अदा पाहून सर्वचंजण घायाळ झाले. मुळात नीथा शेट्टी खूप ग्लॅमरस आहे. तिला पाहिल्यानंतर भल्याभल्यांच्या हृदयात शिट्टी वाजली. नीथा कोण आहे, तुम्हाला माहितीये का?

३१ ऑक्टोबरला नीथाचं स्वागत महेश मांजरेकर यानी केलं. तिला विचारण्यात आलं की, तिने या शोमध्ये सेकंड वाईल्ड कार्ड कंटेस्टेंट म्हणून एंट्री करण्याचा निर्णय का घेतला? यावर ती म्हणाली, हे तिच्या मोठ्या स्वप्नांपैकी एक होतं आणि खूप उत्साहित आहे. बिग बॉसच्या घरात दाखल होण्यासाठी. बिग बॉसच्या घरात आदिश वैद्यनंतर ही दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री आहे.

नीथाने घरात एंट्री केल्यानंतर तेथील स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. कारण, नीथा इंडस्ट्रीतील एक प्रसिध्द नाव आहे आणि तिचे फॅन फॉलोइंगदेखील अधिक आहेत. इन्स्टाग्रामवर नीथाचे १ लाख ९६ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.

नीथाने आतापर्यंत २९ मालिका आणि ४ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. सोबतच ती काही वेब सीरिजमध्ये दिसली होती. 'गंदी बात-4 'मध्ये तिने खूप बोल्ड सीन दिले आहेत.

'तेनाली रमण', 'घरी की लक्ष्मी बेटियाँ', 'परावतार श्री कृष्ण' अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय. तेनाली रमणमधील तिची भूमिका चांगली गाजली होती. नीथा उत्कृष्ट नृत्यांगना, अभिनेत्री व मॉडेल आहे. 'फुगे' या चित्रपटातून नीथाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

नीथाने धुंड लेगी मंजिल हमें या मालिकेत तिने आरतीची भूमिका साकारली होती. एक दिन अचानक, प्यार की एक कहाणी, ससुराल सिमर का, सियासत, एमटीव्ही बिग एफ यासारख्या टीव्ही मालिका आणि शोमधून तिने काम केलंय.

आता बिग बॉसच्या घरात तिच्या येण्याने काय काय बदलणार? कोण नॉमिनेट होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news