BB Marathi 3 घरामध्ये रंगणार डब्बा गुल साप्ताहिक कार्य | पुढारी

BB Marathi 3 घरामध्ये रंगणार डब्बा गुल साप्ताहिक कार्य

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

नवा आठवडा नवा टास्क… काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (BB Marathi) नॉमिनेशन कार्य पार पडले. ही प्रक्रिया जरा अनपेक्षितरीत्या सदस्यांनी पार पडली. जिथे गायत्रीने आणि उत्कर्षला जयला नॉमिनेट केले. आणि याचमुळे जय उत्कर्षवर नाराज आहे. काल उत्कर्ष जयला त्याने असे का केले याचे स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करत होता, पण जयला त्याने दिलेले कारण पटत नव्हते असे दिसून आले आणि तो असे देखील म्हणाला आता मी कोणासाठी खेळणार नाही. (BB Marathi)

बघूया आज घडणार जय आणि उत्कर्षमधील हे गैरसमज उत्कर्ष कसा दूर करणार, कसा त्याला त्याचा मुद्दा पटवून देणार. या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत. विशाल निकम, सोनाली पाटील, तृप्ती देसाई, मीनल शाह आणि जय दुधाणे. बघूया कोण होणार सेफ आणि कोणाला जावे लागणार घराबाहेर. आज घरामध्ये रंगणार आहे “डब्बा गुल” हे साप्ताहिक कार्य.

कार्यामध्ये देखील दोन टीम असल्याचे दिसून येते आहे. ज्यामध्ये सोनालीने मीनलला उत्तर दिले आहे “अजून खेळ सुरू व्हायचा आहे ना… महाभारत. आणि अगदी तसेच घडणार असे दिसून येते आहे. घरातील सदस्यांनी पुन्हा एकदा कुस्तीचा आखाडा बनवून ठेवला आहे.

ओढाताण, पाय खेचणे, धक्काबुक्की, शाब्दिक वार होताना दिसतं आहेत. टास्क दरम्यान विशाल म्हणाला आहे माझ्याजवळ कोणी यायचं नाही. तर, पुन्हा एकदा भिडणार मीरा – मीनल. जिथे मीनल मीराला म्हणाली आहे “तू धक्काबुक्की का करतेस” त्यावर मीरा म्हणाली, “चल निघ…” बघूया हा वाद कुठवर जातो ते.

तेव्हा बघता राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button