पुढारी ऑनलाईन डेस्क : शेमारू मराठीबाणा चॅनेलवरील मालिका 'जोगेश्वरीचा पती भैरवनाथ' मधील 'जोगेश्वरी' म्हणून क्षमा देशपांडे उत्कृष्ट अभिनय साकारणार आहे. ग्रामदेवता भैरवनाथ आणि त्यांची पत्नी जोगेश्वरी यांची कहाणी दर्शवण्यात येईल. प्राचीन परंपरा आणि पौराणिक कथांच्या पार्श्वभूमीवर, "जोगेश्वरीचा पती भैरवनाथ" भेटीला येत आहे. क्षमा देशपांडे देवी जोगश्वरीची भूमिका साकारतेय. ती एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे.
'देवी जोगेश्वरी' ची भूमिकेबद्दल क्षमा देशपांडे म्हणाली, "ही संधी खऱ्या अर्थाने मिळाल्यासारखी वाटते. देवी जोगेश्वरीचे चित्रण करणे हे केवळ एक कलात्मक आव्हानच नाही तर हा एक खोल अध्यात्मिक अनुभव आहे. या पात्राच्या भावना आणि सार व्यक्त करण्यासाठी मला परिपूर्ण साधने उपलब्ध करून दिल्या आहेत, माझी शास्त्रीय नृत्याची पार्श्वभूमी मला या व्यक्तिरेखेच्या भावना आणि सार चेहऱ्यावरील हावभावांद्वारे व्यक्त करण्यास सक्षम करते. भैरवनाथ आणि जोगेश्वरीच्या नात्याची अनोळखी कहाणी उलगडणाऱ्या शोचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे."
२१ ऑगस्टपासून 'जोगेश्वरीचा पती भैरवनाथ' भेटीला येणार आहे.