Gadar 2 actress Simratt Kaur : कोण आहे सिम्रत कौर, बी ग्रेड चित्रपटांमध्ये केलंय काम? | पुढारी

Gadar 2 actress Simratt Kaur : कोण आहे सिम्रत कौर, बी ग्रेड चित्रपटांमध्ये केलंय काम?

पुढारी ऑनलाईन डेस्क : गदर -२ मध्ये अमीषा पटेल आणि सनी देओलसोबत दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा अभिनेता उत्कर्ष शर्मादेखील दिसत आहे. या चित्रपटामध्ये पंजाबी अभिनेत्री सिमरत कौर (Gadar 2 actress Simratt Kaur ) देखील तारा सिंहची (सनी देओल) सुनेच्या भूमिकेत आहे. सिमरत कौरच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. दरम्यान, सिमरत कौरचा सोशल मीडियावर एक इंटिमेट व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामुळे तिला नेटकरी ट्रोल करू लागले. गदर २ मधील या अभिनेत्रीला मागील काही चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन केल्यामुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. पण, गदरची मुख्य अभिनेत्री अमिषा पटेलने तिचा बचाव केला आणि ट्रोलर्सना उत्तरही दिले होते. (Gadar 2 actress Simratt Kaur)

अमीषाने एका ट्रोलला उत्तर दिले होते ज्याने गदर 2 मधील सिमरत कौरच्या कास्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि तिच्या तेलुगू चित्रपटांमधील काही इंटिमेट क्लिप पोस्ट करून लिहिले होते-

कोण आहे सिमरत कौर?

सिमरत कौर ही भारतीय अभिनेत्री आहे. तिने यापूर्वी अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केल्याचे वृत्त आहे. तिने तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे. २०१७ मध्ये कार्तिकेय गुम्माकोंडासोबत अभिनय केलेल्या प्रेमथो मी कार्तिक या चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केले होते. सिमरतचे पूर्ण नाव सिमरत कौर रंधवा असून तिचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला. तिने बीएससी कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. २०१८ मध्ये तिने परिचय आणि सोनी या चित्रपटात काम केले.

हिमंत संधूच्या बुर्ज खलिफा आणि लारा लप्पा सारख्या पंजाबी संगीत व्हिडिओंमध्ये ती दिसली होती. २०२१ मध्ये, तिने मिका सिंग तेरे बिन जिंदगी या रोमँटिक गाण्यात काम केलं आहे. २०२२ मध्ये तिला नागार्जुनच्या बंगारराजूच्या छोट्या भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली. आता ती गदर २ चित्रपटामुळे चर्चेत आली. या चित्रपटात ती अभिनेता उत्कर्ष शर्मासोबत भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Utkarsh Sharma (@iutkarsharma)

Back to top button