फॅन्ससाठी खुशखबर! D51 ची घोषणा; Rashmika Mandanna धनुषसोबत झळकणार (Video) | पुढारी

फॅन्ससाठी खुशखबर! D51 ची घोषणा; Rashmika Mandanna धनुषसोबत झळकणार (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि साऊथ स्टार धनुष पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. D51 असे चित्रपटाचे नाव असल्याची माहिती समोर आलीय. (Rashmika Mandanna) ट्विटर रश्मिकाचे नाव ट्रेंड होऊ लागले आहे. या चित्रपटाचे पोस्टरदेखील समोर आले आहे.

साउथ सुपरस्टार धनुष दिग्दर्शक शेखर कम्मुलासोबत चित्रपट करायला तयार आहे. आता रश्मिका मंदाना पहिल्यांदाच धनुषसोबत काम करेल. तसेच अक्किनेनी नागार्जुनजेखील या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. धनुषकडे सध्या काही चित्रपट आहेत, त्यातील एक शेखर कम्मुलाचा चित्रपट आहे. यामध्ये रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे.

Back to top button