Ananya Panday तीन फ्लॉप चित्रपट आणि ७२ कोटींची मालकीण

Ananya Panday तीन फ्लॉप चित्रपट आणि ७२ कोटींची मालकीण
Published on: 
Updated on: 

बॉलीवूडमधील यंग स्टारपैकी एक अनन्या पांडे या अभिनेत्रीचं नाव सध्या चर्चेत आहे. आर्यन खान ड्रग्स केसमध्ये एनसीबीकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) अनन्या पांडे हिची चौकशी होतेय. तिच्या घरीदेखील एनसीबीने छापेमारी केलीय. अनन्या बॉलीवूडमधील रायझिंग स्टार आहे.

तुम्हाला माहितीये का? अनन्याने आतापर्यंत केवळ तीन चित्रपट केले आहेत. यामध्ये स्टुडेंट ऑफ द ईअर-२, पती पत्नी और वो-२ आणि खाली पीली या चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाहीत. पण, तरीही अनन्याची लोकप्रियता वाढतचं राहिली.

तिचा जन्म ३० ऑक्टोबर, १९९८ रोजी मुंबईत झाला. अनन्याच्या आईचे नाव भावना पांडे आहेत. तिला एक बहिण रीसा पांडे देखील आहे. तिने २०१७ मध्ये शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, मुंबईतून पूर्ण केलेय. पुढील शिक्षणासाठी ती University of South California, Los Angeles मध्ये फॅशन स्टडीमध्ये प्रवेश घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २३ वर्षांच्या अनन्याची संपत्ती ७२ कोटी रुपये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका चित्रपटात काम करण्यासाठी ती जवळपास २ कोटी रुपये मानधन घेते.

चित्रपटांशिवाय ती अनेक ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही चांगली कमाई करतेय. सोशल मीडियावरही ती ॲक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे २०.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. या फॅन बेसचा फायदा तिला ब्रँड प्रमोशन करतानाही होतो.

अनन्या ही अभिनेते चंकी पांडेची मुलगी आहे. बालपणापासून तिला चित्रपटात अभिनय करायचा होता. तिला आपल्या वडिलांप्रमाणे बॉलीवूडमध्ये बस्तान बसवायचे होते. २१ व्या वर्षी तिला स्टुडेंट ऑफ द ईअर-२ मध्ये ब्रेक मिळाला.

यानंतर तिला आणखी एक चित्रपट मिळाला. SOTY-2 मधील उत्कृष्ट परफॉर्मन्ससाटी तिला बेस्ट फिमेल डेब्यु फिल्मफेअर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. अंग्रेजी मीडियम या चित्रपटात अनन्य़ाने 'कुडी नू नचे दे' या हिंदी गाण्यातून कॅमियो केला होता.

Vanity Fair मध्ये सहभागी झाली

२०१७ मध्ये तिने Vanity Fair's 'Le Bal Des Debutantes' इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. वॅनिटी फेयर एक मासिक आहे, जे US चे प्रसिद्ध मासिक आहे. Le Bal des débutantes event मध्ये अनन्याने भाग घेतला होता. या स्पर्धेत निवड होणेदेखील खूप मोठी बाब मानली जाते. जगभरातून या स्पर्धेत केवळ २०-२५ मुलींची निवड केली जाते. या मुलींचे वय १६-२२ दरम्यान असते. ही स्पर्धा प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यात होते.  या स्पर्धेत अनन्याने वयाच्या १९ व्या सहभाग घेतला होता.

विजय देवरकोंडासोबत झळकणार

अनन्या आगामी चित्रपट लायगरमध्ये साऊथ स्टार विजय देवराकोंडासोबत झळकणार आहे. लायगर हा चित्रपट पुरी जगन्नाथ दिग्दर्शित करत आहेत. लायगर हा चित्रपट २३ सप्टेंबर, २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

याशिवाय ती खो गए हम कहां हा चित्रपटदेखील करणार आहे. त्याचबरोबर, दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत तिचा आणखी एक चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.

अनन्याला फिरण्याची आवड आहे. ती अनेकदा स्टार किड्ससोबत फिरायला जाते. तिला डान्स करायला आवडते. तिला वाचन करणेही आवडते. तिला चॉकलेट आणि पिझ्झा खूप आवडतो.

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news