अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणते मूर्खपणाचा कळस माझी आई पंजाबी; ती करवा चौथ करते | पुढारी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणते मूर्खपणाचा कळस माझी आई पंजाबी; ती करवा चौथ करते

पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee kulkarni) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.अभिनेत्री  सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंवर फॅन्स कमेंट करत असतात. कमेंट कधी चांगल्या असतात तर कधी वाईट असतात. आजही सोनाली कुलकर्णी एका फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

आज सोनाली कुलकर्णी (Sonalee kulkarni) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. तिचा हा फोटो पतीसोबतचा दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिली आहे. ”आज हमारी पहली करवा चौथ है …मी मुंबईहून दुबईत पोहचलीये, नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईल याची खात्री आहे” अशी कॅप्शन तिने दिली आहे.

या कॅप्शनमुळे अनेकांनी फॅन्संनी कमेंट केल्या आहेत. यात एका फॅन्सने ”भय्या सोबत लग्न केलं आणि आम्हाला फसवलं मराठी म्हणून” अशी कमेंट करत ती पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. याच पोस्टला सोनाली कुलकर्णी ने कमेंट केली आहे.

”मूर्खपणाचा कळस. माझी आई पंजाबी आहे आणि ती करवा चौथ करते” अशी कमेंट सोनालीने (Sonalee kulkarni) केली आहे. या कमेंटखाली अनेकांनी सोनालीला लक्ष देवू नका अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका फॅन्सने ”तेच तर मी पण म्हणत आहे,पंजाबी आहे तर मग हिंदीचा काय संबंध ? मूर्खपणाचा कळसच आहे की मग” अशी कमेंट केली आहे. तर अजुन एका फॅन्सने “मराठी संस्कृती जपा. मराठी माणसानेच मोठं केलंय लक्षात असुद्या” अशी कमेंट केली आहे.

सोनालीला फॅन्सचा पाठिंबा

या पोस्टमध्ये अनेक फॅन्सनी कमेंट करुन सोनाली कुलकर्णीला (Sonalee kulkarni) सपोर्ट दिल्याचे दिसत आहे.

 सोनाली कुलकर्णी ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले आहे. तिचा नवरा म्हणजे कुणाल बेनोडेकरला ‘केनो’ या नावानेही ओळखले जाते. कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झाले आहे. त्याने ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून त्याने उच्च शिक्षण घेतले आहे.

हेही वाचलत का?

 

Back to top button