...आणि 'कंगना राणावत' हिची झी मराठी अवॉर्ड्समध्ये अशी झाली एन्ट्री? | पुढारी

...आणि 'कंगना राणावत' हिची झी मराठी अवॉर्ड्समध्ये अशी झाली एन्ट्री?

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बॉलिवूडमधील नेहमीचं चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे ‘कंगना राणावत’. नुकतंच संपन्न झालेल्या झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये देखील ‘कंगना राणावत’ हिने हजेरी लावल्याची चर्चा सुरु आहे. पण हे खरं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये कंगना नाही तर श्रेया बुगडेने एका प्रहसनात कंगनाची भूमिका साकारली; पण तिने इतकी हुबेहूब कंगना साकारली की, सगळ्यांना खरोखर मंचावर कंगनाच आहे काय, असा प्रश्न पडला. हे प्रहसन पाहताना तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांच्या हसून हसून डोळ्यात पाणी आलं. सर्वांनी श्रेयाच्या मिमिक्रीचं सगळ्यांनी कौतुक देखील केलं. चला हवा येऊ द्याच्या विनोदवीरांनी सादर केलेल्या या दिवाळी अधिवेशनात कंगना सोबत अनेक राजकारणी सहभागी होणार आहेत.

तेव्हा दिवाळी अधिवेशनातली खमंग चर्चा पाहायला विसरू नका. झी मराठी अवॉर्ड्स २०२१ शनिवार ३० ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

हेही वाचलं का?

Back to top button