ARYAN KHAN DRUG CASE : ‘आर्यनला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली नाही’

ARYAN KHAN DRUG CASE : ‘आर्यनला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली नाही’
Published on
Updated on

शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणात (ARYAN KHAN DRUG CASE ) अडकल्यामुळे तो १७-१८ दिवसांपासून कारागृहात आहे. तो कारागृहात अस्वस्थ असल्याचेही बोलले जात आहे. गुरुवारी सकाळी शाहरुख खानने आर्थर रोड कारागृहात जाऊन आर्यनची भेट घेतली. फार गाजावाजा न करता छोट्या गाडीतून येऊन त्याने आर्यनची भेट घेतली. दरम्यान, आर्यनसोबत बराक क्र. १ मध्ये असलेल्या कैद्याने आर्यनची कैफियत मांडली. श्रणन नागराज असे त्या कैद्याचे नाव आहे. (ARYAN KHAN DRUG CASE)

खरंतरं हा कैदी आर्यनचा निरोप घेऊन मन्नत बंगल्यावर पोहोचला होता. शाहरुख आणि गौरी खान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आर्यनशी संवादही साधला होता. पण, कोरोना प्रोटोकॉलमुळे, कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी समोरासमोर भेटता येत नाही. पण, या प्रोटोकॉलमध्ये त्यांना काही सवलत मिळाली. त्यामुळे शाहरुख आपल्या मुलाला कारागृहात जाऊन भेटू शकला.

…आणि कैदी पोहोचला मन्नत बंगल्यावर

शारुख आर्यनला भेटण्यापूर्वी एक कैदी मन्नतवर निरोप घेऊन पोहोचला होता. श्रणन हा आर्यनसोबत तुरुंगात होता. तो आर्यनचा निरोप घेऊन शाहरुखचा मन्नत बंगल्यावर गेला. पण, शाहरुख खानच्या कुटुंबीयांनी त्याला दाद दिली नसल्याचे तो सांगतो. त्यामुळे माघारी फिरल्याचेही एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

आर्यनला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली नाही

आर्यन खानला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच ट्रीट केलं, आहे. व्हीआयपी ट्रीटमेंट अजिबात दिलेली नाही. कैद्यांप्रमाणेचं त्यालाही जेवण मिळतं. पण, आर्यनकडे पैसे नसल्याने तो कँटीनमधून काही खरेदी करू शकत नाही. यासाठी इतर कैदी त्याला मदत करायचे. त्याला काही कैद्यांनी बिस्कीटंदेखील खायला दिली आहेत. श्रणन म्हणतो, आर्यनने माझ्याजवळ निरोप दिला होता. घरी जाऊन मला पैसे मनीऑर्डर करायला सांगा. मी त्यासाठी मन्नतवर गेलो. पण मला तिथं काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

जेव्हा शाहरुख मुलाला भेटतो…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला भेटण्यासाठी शाहरुख खान तुरुंगात गेला होता. त्यावेळी तो छोयच्या गाडीतून पोहोचला. यासाठी शाहरुखला स्पेशल ट्रिटमेंट मिळाली नाही. भेटीच्या वेळी आर्यन खान आणि शाहरुख यांच्यामध्ये एक ग्रिल आणि काचेची भिंत होती. महाराष्ट्रात कोरोना प्रोटोकॉलमुळे असे करण्यात आले होते. शाहरुख आणि आर्यन हे इंटरकॉमवर बोलले. यावेळी दोन सिक्युरिटीही तेथे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news