१०० कोटी लसीकरण हे भारताच्या सामर्थ्याचे दर्शन आहे. लसीकरणाबाबत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सकाळी १० वाजता देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी १०० कोटी लसीकरणाचा पुनुरुच्चार करत आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
ते म्हणाले. 'आपण १०० कोटी लसीकरणाचा टप्पा नुकताच पार पाडला आहे. मी संपूर्ण भारतीयाचं मनःपूर्वक अभिनंदन करतो, केवळ एक आकडा नाही तर ती आरोग्य सेवेची उद्दिष्टपूर्ती आहे. १०० कोटी डोसचा ठप्प पूर्ण करणे हि असाधारण गोष्ट आहे. १३० कोटी जनतेच्या सहकार्यामुळे १०० कोते डोसचा टप्पा गाठता आला.
विक्रमी लसीकरचे यश हे संपूर्ण भारताचं यश आहे. या घटनेमुळे नवीन भारताचं दर्शन संपूर्ण जगाले घडलंय. थाळी वाजवून दिवे प्रज्वलितत करून भारताने एकात्मतेचे दर्शन घडविले. सबका साथ सबका विकास सबका प्रयास यशस्वी करून दाखवलं.
लसीकरणावरून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला हे एक प्रकारचे उत्तर आहे. भारत कोरोनापासून सुरक्षित आहे हे आपण जगाला दाखवून दिने आहे. कोणताही भेदभाव न करता लसीकरण करून दाखवणं हे आमचे उद्दिष्ट होते. लसीकरण मोहिमेत व्हीआयपी कल्चरचा हा शिरकाव करू दिला नाही. जे बड्या राष्ट्रांना जमले नाही ते भारताने करून दाखवले. या मोहिमेचे जगभरातून कौतुक केले आहे.
लसीकरण मोहीम राबवताना भारताने विज्ञानांची कास सोडली नाही. अतिशय वेगाने लसीकरण होण्यासाठी योग्य यंत्रणा राबकवली. लसीकरण मोहिमेसाठी वापरण्यात आलेल्या को- वीन ॲपचे जगभरातून कौतुक होत आहे. ( १०० कोटी लसीकरण मोदी )
गेल्या काही दिवसांपासून आपण अर्थव्यवस्थेशी झुंज देत आहोत. सणवार तोंडावर असल्याने अर्थव्यवस्थेत सकारात्मक चित्र दिसेल. भारतात स्वदेशी वस्तूंसाठी चळवळ उभारली पाहिजे. नवा भारत कोणतेही लक्ष गाठू शकतो.
हेही वाचा :