वेडसर महिलेवर बलात्कार, आरोपीने केला गुन्हा कबुल

वेडसर महिलेवर बलात्कार, आरोपीने केला गुन्हा कबुल
Published on
Updated on

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर येथे एका वेडसर महिलेवर बलात्कार करणार्‍यास एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. ही घटना 20 ऑक्टोबर रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

नरेश मुरलीधर मॅकल (वय 29, रा. नीलमनगर) या आरोपीला त्या वेडसर महिलेच्या शेजारी झोपलेल्या अवस्थेत पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल बिरूदेव माळी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

यात म्हटले आहे की, 20 ऑक्टोबर रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास वेणूगोपाळ गुंडेली (रा. गांधीनगर प्लॉट नं. 16) यांनी नियंत्रण कक्षास केलेल्या कॉलवरून एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गांधीनगर येथे एका वेडसर महिलेस तिच्या वेडसरपणाचा फायदा घेऊन तिच्यावर एकाने बलात्कार केला. तो त्या वेडसर महिलेच्या शेजारीच झोपलेला आढळून आला.

पोलिसांनी आरोपी नरेश मॅकल याला रंगेहात पकडले. तेेव्हा आरोपीने गुन्हा कबुल केला. पोलिसांनी आरोपी नरेश मॅकल याला अटक केली आहे.

या फिर्यादीवरून वरील आरोपीविरूध्द भादंवि कलम 376 (3)(एल) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news