Avantika Dasani : भाग्यश्रीची कन्याही बॉलीवूडमध्ये! | पुढारी

Avantika Dasani : भाग्यश्रीची कन्याही बॉलीवूडमध्ये!

पुढारी ऑनलाईन : ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर यशाचे शिखर गाठणारी भाग्यश्री आजदेखील मनामनात ताजीतवानी आहे. याच भाग्यश्रीची कन्या अवंतिका ( Avantika Dasani ) देखील लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

अवंतिकाच्या पहिल्या चित्रपटाचे अलीकडेच लखनौमध्ये चित्रीकरण सुरू झाले असून या चित्रपटाचे नाव आहे. ‘यू शेप की गली..’
हा चित्रपट रोमॅटिक म्युझिकल थिमवर बेतलेला असून यात अवंतिकासह विवान शाहची मुख्य भूमिका असणार आहे. चित्रपटातील पात्रांची नावेही जाहीर केली गेली असून हरिया व शबनम यांच्याभोवती कथानक गुंफलेले असणार आहे. अभिनेता जावेद जाफरीचा या चित्रपटात छोटासा रोल असणार आहे.

अविनाश दास निर्मित या चित्रपटात सुशांत सिंह, नमिता सिंह व इश्तियाक खान यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाला अमाल मलिक यांचे संगीत लाभले आहे. दस्तुरखुद्द भाग्यश्री हीदेखील आपला सुपुत्र अभिमन्यू व पती हिमालय यांच्यासह अलीकडेच ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटात पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत झळकली होती. या चित्रपटात सलमान खान, पलक तिवारी मुख्य भूमिकेत होते. भाग्यश्रीचा ‘छत्रपती’ हा नवा चित्रपटदेखील लवकरच रीलिज होणार आहे. ( Avantika Dasani )

Back to top button