

'राजी'सारख्या हिंदी चित्रपटात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ग्लॅमरस फोटोशूट केलाय. हिंदी आणि मराठी चित्रपटांतून अमृताने (Amruta Khanvilkar) आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीय. तिचा ग्लॅमरस अंदाज देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतो. उत्तम अभिनेत्री असणारी अमृता एक उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. तिच्या ग्लॅमरस फोटोला एकापेक्षा एक कमेंट येत आहे. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट दिलीय.
अमृताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक ड्रेसमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये ती ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटोमध्ये दिसते. ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमधील तिचा हॉट अंदाज पाहण्यासारखा आहे.
फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. तसेच न्यूड मेकअप केले आहेत. केस मोकळे सोडल्याने तिचा हा हॉट लूक खूपचं सुंदर दिसतो आहे.
तिच्या या फोटोंतील हॉट अदा पाहण्यासारख्या आहेत. अनेक फोटोंमध्ये तिचा कातिलाना अंदाज आणि तिरछी नजरही पाहायला मिळतेय. हॉट स्टाईलमध्ये तिची पोझ सर्वांचे लक्ष वेधून घेतेय.
तिच्या एका फोटोला एका नेटकऱ्याने अशी कमेंट दिली की, ज्यामुळे अमृता भडकलीय. तिने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.
'मॅडम कपडे घालून सुद्धा फोटो छान येतात.' अशी कमेंट त्या नेटकऱ्याने दिली. ते पाहून अभिनेत्री स्वतःला रोखू शकली नाही. तिने लगेचच त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
अमृता म्हणाली, 'मग कपडे घातले नाहीत, असं वाटतंय का तुम्हाला?' तिच्या या प्रत्युत्तरची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.
अमृता सचिन कुंडलकरच्या 'पॉंडिचेरी' चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत वैभव तत्ववादी, महेश मांजरेकर आणि सई ताम्हणकर हे महत्त्वाचे कलाकार असतील.