jammu kashmir attack : भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरूच, २ जेसीओ आणि ५ जवान शहीद | पुढारी

jammu kashmir attack : भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरूच, २ जेसीओ आणि ५ जवान शहीद

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

जम्मू काश्मीरच्या पुंछमधील मेंढरच्या नार भागातील जंगलात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मागच्या चार दिवसांपासून गोळीबार सुरू आहे. (jammu kashmir attack) दरम्यान भारतीय लष्करातील जेसीओ आणि एका जवान शहीद झाले आहेत. ते दोघेही गंभीररीत्या जखमी अवस्थेत होते. अद्यापही हा गोळीबार सुरूच आहे. १० ऑक्टोबर रोजी रात्री दहशतवादी आणि लष्करासोबत झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांनी हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. (army officer and a soldier have been critically injured in a counter terror operation in jammu kashmir s poonch)

जम्मू-पुंछ महामार्गावरील वाहतुक पुर्णपणे थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत आतापर्यंत एका अधिकाऱ्यासह एक जवान शहीद झाला. तर एक जण जखमी आहे. १० ऑक्टोबर रात्रीपासून सुरू झालेला गोळीबार अद्यापही सुरूच आहे. या चकमकीत २ जेसीओंसह ५ जवान शहीद झाले आहेत.

jammu kashmir attack : दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही माघार नाही

लष्कर चार दिवसांपासून या दहशतवाद्यांचा पाठलाग करत आहे. उंच डोंगर आणि जंगलांचा फायदा घेऊन दहशतवादी सतत सैन्याला चकवा देत आहेत. दरम्यान आज भारतीय सैन्य आणि दहशतवादी आमने सामने आले. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय लष्करातील १ जेसीओ आणि २ जवान यामध्ये शहीद झाले आहेत. परंतु लष्कराचा असा विश्वास आहे की भारतीय जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.

जम्मू- काश्मीर मधील पुंछ सेक्टरमध्ये (Poonch Encounter) सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु आहे. या चकमकीत ५ सुरक्षा जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. यात एक अधिकारी (junior commissioned officer- JCO) आणि चार जवानांचा समावेश आहे. याआधी आज सकाळी अनंतनाग आणि बांदीपोरामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.

पाच जवान शहीद

जम्मू- काश्मीर मधील पुंछ सेक्टरच्या (Poonch Encounter) सूरनकोट भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. या भागात सर्च ऑपरेशन सुरु होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात पाच जवान शहीद झाले आहेत.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी एलओसी ओलांडून चमरेर जंगलापर्यंत आले होते. ते जंगलातून बाहेर पडले नाहीत. त्यांना जवानांनी चोहोबाजुने घेरले आहे. येथे अद्याप चकमक सुरु आहे. जंगलात तीन ते चार दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली आहे.

बंदीपोरामध्ये चकमक, लष्कर ए तोयबाचा दहशतवादी ठार (lashkar-e-taiba)

बंदीपोरा जिल्ह्यात झालेल्या दुसऱ्या एका चकमकीत लष्कर ए तोयबाचा दहशतवादी ठार झाला. इम्तियाज अहमद दार असे त्याचे नाव असून तो लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. त्याचा शाहगुंड बंदीपोरा येथे झालेल्या एका नागरिकाच्या हत्येत सहभाग होता, अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे.

Back to top button