Tejashree Pradhan खुपच सुंदर म्हणजे दुधात साखरचं गं बाई!

होणार सून मी त्या घरची, अग्गंबाई सासूबाई यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan हिने आपल्या अभिनयाची जादू दाखवलीय. आपल्या सौंदर्यानेही तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने लाखो-करोडो चाहत्यांना घायाळ केलंय. तिचे नवे फोटो व्हायरल झाले आहेत. #festivalvibes अशी कॅप्शन लिहित तिने साडीतील दोन फोटो शेअर केले आहेत. खूप मेकअप किंवा साजशृंगार दिसत नसला तरी तिचा हा लूक साधा पण, खूप सुंदर आहे. तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट्स येताहोत. खुपच सुंदर, म्हणजे, दुधात साखर अशी दुसऱ्या फोटोत तिने टी-शर्ट घातलेला दिसतो. या फोटोला तिने Because I loved my lipstick shade🤩 #HappyLife अशी कॅप्शन लिहिलीय. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपचं सुंदर दिसतेय.
हिंदी चित्रपटात दिसणार
तेजश्री हिंदी चित्रपटात दिसणार आहे. बबलू बॅचलर असे तिच्या चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये हिंदी अभिनेता शर्मन जोशी मुख्य भूमिकेत आहे. तेजश्रीने खुद्द ही माहिती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिलीय. काही फोटोदेखील तिने शेअर केले आहेत. तिने चित्रपटाची टीम आणि काही कलाकारांसोबत हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोवर लिहिले आहे की, ‘फायनली बबलू बॅचलर चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी दहा दिवस राहिले आहे.’ पूजा चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अग्निदेव चटर्जी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तिचं चाहत्यांकडून अभिनंदन केलं जातंय.
तिने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलंय. तिने ‘सून मी या घरची’ ‘अगंबाई सासूबाई’ ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय. ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.
बबलू बॅचलर २२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
- स्वरदा ठिगळे साकारणार स्वराज्य सौदामिनी ताराराणी
- ‘मन उडू उडू झालं’ चा नवरात्र विशेष भागासाठी ३५ तासांची मेहनत
- गर्लफ्रेंड महिन्याला १५ लाख पगार देते बॉयफ्रेंडला ! ‘ही’ कामे करावी लागतात
View this post on Instagram