भाजपची अवस्था वाघ कळपात शिरलेल्या मेंढरासारखी; सेनेची टीका

भाजपची अवस्था वाघ कळपात शिरलेल्या मेंढरासारखी; सेनेची टीका
Published on
Updated on

शिवसेनाचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यानंतर मेंढरांची होते तशी झाली आहे ( ( सेनेची टीका ). भाजपची मंडळी जी बेताल वक्तव्ये करत आहेत, ती ऐकूण लोकांची खूप करमणूक होत आहे, अशी टीका शिवसेनेने  केली आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा आज षण्मुखानंद हॉलमध्ये होत आहे. सध्या मुबंई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भूमिका मांडली असून शिवसेना हा एक ज्वलंत विचार आहे. सदैव उसळणारा ज्वालामुखीच आहे. शिवसेना सत्तेत आल्यापसून राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे. ही वाताहत पाहून आम्हाला या मंडळींची कीव करावीशी वाटते. विचारांचे सोने लुटा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी शत्रुत्व करू नका, असे त्यांना सांगण्याचीच सोय नाही. दोन वर्षांपासून महाराष्ट्रात 'ठाकरे' सरकार काम करीत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरून सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्र आता काढावीच लागतील.

महाराष्ट्र हा सोन्यासारखा प्रदेश आहे. हे राज्य कायम तेजस्वी सूर्यासारखे तळपत राहिले. त्याच तेजाची माणसे येथे जन्मास आली. त्यामुळे विचारांचे सोने महाराष्ट्र सदैव उधळत राहिला. महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे, पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत व महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे.

केंद्र सरकारने मर्जीतल्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृत्रिम कोळसा टंचाई निर्माण केली की काय? असे प्रश्न विचारले जात आहेत. कारण केंद्र सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे 'व्यापारी' सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते.

सेनेची टीका : हा कसला अमृतमहोत्सव?

केंद्रातले भाजप सरकार म्हणे आझादीचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. पण देशात बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आज खरेच उरले आहे का? जे सरकारला प्रश्न विचारतात, खडे बोल सुनावतात त्यांच्यावर सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर खात्याच्या धाडी घालून दहशत निर्माण केली जाते.

हक्क मागणाऱ्यांना चिरडून मारता?

शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मागण्याचे स्वातंत्र्य नाही. आपले न्याय्य हक्क लोकशाही मार्गाने मागणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्र्याच्या पोराने गाडीखाली चिरडून मारले. त्या गुन्हेगारांना अटक करा, अशी मागणी करण्याचे स्वातंत्र्य राजकीय पक्षांना नाही. ती मागणी करणाऱ्या प्रियंका गांधीना तुरुंगात डांबले जाते.

मराठी माणूस हरला म्हणून पेढे वाटता?

एरवी मराठी माणसाला पाण्यात पाहणारे, मराठी माणसाच्या बाबतीत शत्रुत्वाची भूमिका घेणारे, बेळगावात मराठी माणूस हरला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारे हे ढोंगी आज मुंबईत 'मराठी कट्टे' सजवीत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या या ढोंगबाजीचा मुखवटाही मराठी माणूस ओरबाडून काढेल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news