PM Narendra Modi : मोदींच्या नावे मते मिळतीलच याची गँरंटी नाही : केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह | पुढारी

PM Narendra Modi : मोदींच्या नावे मते मिळतीलच याची गँरंटी नाही : केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भाजपला तिसऱ्यांदा हरियाणामध्ये जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नावाने आपल्याला मते मिळणार नाहीत, असे मत केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी व्‍यक्‍त केले. हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्‍यात आलेल्‍या बैठकीत ते बाेलत हाेते.

या वेळी  केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह  म्हणाले, पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद आमच्यावर आहेत; परंतू हरियाणात त्यांच्या नावावर आपल्याला मते मिळतील याची  आता गँरंटी नाही. आपल्याला तिसऱ्यांदा हरियाणात राज्य स्थापन करायचे असेल तर मोठा संघर्ष करावा लागेल. मतदारांनी मोदींच्या नावाने मतदान करावे, अशी आमची इच्छा आहे; परंतु भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कामावर या गोष्टी अवलंबून आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कामावर आपल्याला हरियाणात मते मागावी लागतील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

PM Narendra Modi : शेतकरी आंदोलनामुळे मोदींच्या लोकप्रियतेत घट

२०१४ पासून पंतप्रधान मोदींची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. देशातील सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक वेळा त्यांच्या नावावर आणि चेहऱ्यावर मते मिळाली आहेत. ज्या सभांमध्ये पंतप्रधान मोदी संबोधित करतात तेथे पक्षाच्या बाजूने मतांची टक्केवारी निश्चितच वाढल्याचे दिसून आले आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा काही प्रमाणात नकारात्मक परिणाम झाला असल्‍याचेही राव इंद्रजीत सिंह यांनी नमूद केले.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपच्या मोठ्या विजयाचा उल्लेख करताना ते  म्हणाले, नरेंद्र माेदी यांच्‍यामुळेच केंद्रात भाजप सरकार बनवू शकले आहे. त्याचा राज्यांवरही खूप मोठा परिणाम झाला. हरियाणामध्ये त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग होत दोन वेळा सरकार स्थापन स्थापन होऊ शकले, असेही त्‍यांनी सांगितले.

हरियाणात आगामी निवडणुकांमध्ये संघर्ष

भाजपला पहिल्यांदा हरियाणातील ९० पैकी ४७ जागा आणि दुसऱ्यांदा ४० जागा मिळाल्या आहेत. हरियाणामध्ये आपले काठाचे बहुमत असल्याने आपल्याला विचारपूर्वक निवडणुकांची रणनीती आखावी लागेल. आगामी निवडणुकांमध्ये जादुई ४५ हा आकडा मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार असल्याचेही म्हणाले.

हेही वाचलं का ?

Back to top button