मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे फोन, वाय प्लस दर्जाची सुरक्षा | पुढारी

मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे फोन, वाय प्लस दर्जाची सुरक्षा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मागील काही दिवसांपासून  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’च्‍या कार्यपद्‍धतीवर सवाल उपस्‍थित करत आहेत. यावर नवाब मलिक यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्‍यात आली आहे. मला धमकीचे फोन येत आहेत. माझ्या जिवाला धोका असल्याचेही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

माझ्या सुरक्षेत वाढ करून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. कायदा सर्वांना समान आहे. माझ्या जावयाला आठ महिने अटक करण्यात आली. माझ्या मुलीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे.  ती कुठेही वावरताना दिसत नाही.तसेच भाजपकडून बिनबुडाचे आरोप होत असल्याचा दावाही मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी केली.

माझ्‍या जावयावर बिनबुडाचे आराेप

माझ्या जावयाच्या कार्यालयातून गांजा जप्त केल्याचे आरोप करण्यात आला. ते आरोप बिनबुडाचे आहेत. तसेच रिया चक्रवर्ती प्रकरणातही अनेकांना विनाकारण त्रास देण्यात आला. दरम्यान, माझ्या जावयाला अटक करण्यात आल्याने आमच्या कुटूंबाचे मोठे खच्चीकरण झाले. या प्रकरणातील सत्य समोर आणण्‍यासाठी समिती नेमावी. मुंबई पोलिसांनी सर्वांचे कॉल रेकॉर्ड तपासावे ,असेही ते म्हणाले. या प्रकरणात पंचनामेही बनावट असल्याचा आरोपही त्यांनी केला.

माझा जावई समीर खानला २०० किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असे ही सांगण्यात आले. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि पत्रकार परिषदेची माहिती समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचे उघड झाल्याचेही यावेळी  नवाब मलिक यांनी सांगितले.

मलिक यांच्‍या ट्विटची जोरदार चर्चा

मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है, मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ।, असं सूचक ट्विट नवाब मलिक केले. यावर जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचलं का ?

 

Back to top button