तारक मेहता : साधी अंजली भाभी रिअल लाईफमध्ये खूपचं ग्लॅमरस - पुढारी

तारक मेहता : साधी अंजली भाभी रिअल लाईफमध्ये खूपचं ग्लॅमरस

पुढारी ऑनलाईन :

टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामधील अंजली भाभीविषयी तुम्हाला माहिती आहे का?या शो मधील पात्रांचे विविध अंदाज पाहायला मिळतात. असेच एक पात्र आहे अंजली भाभी हिचे. पंजाबी ड्रेसमध्ये साधी सरळ दिसणारी अंजली भाभी रिअल लाईफमध्ये खूपचं ग्लॅमरस आहे. तिचे खरे नाव सुनयना फौजदार असे आहे. मालिकेत ती एका परफेक्ट हाऊस वाईफच्या भूमिकेत आहे. पण, खऱ्या आयुष्यात ती खूप बोल्ड आहे.

आता सुनयनाचे सोशल मीडियावर काही बिकिनी फोटो व्हायरल होत आहे. तिने काही दिवसांपूर्वी आपले फोटो शेअर केले होते. या मालिकेत ती नेहमी पंजाबी ड्रेसमध्ये दिसणारी सुनयनाला बिकिनीमध्ये पाहून फॅन्स खूप चिंतेत होते. सुनयना नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.

तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती चाहत्यांसाठी नेहमी बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता सुनयनाचे नवे फोटो व्हायरल झाले आहेत. मध्यंतंरी, तिचा बिकिनीतील फोटो व्हायरल झाला होता. ती पिंक आणि ब्लॅक कलरच्या मोनोकनी बिकिनीमध्ये दिसत होती. सुनयना स्विमिंग पूलमध्ये एकापेक्षा एक पोझ देताना ती दिसत होती. तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.

या मालिकेत अंजली मेहताची भूमिका आधी नेहा मेहताने साकारली होती. परंतु, तिने हा शो सोडला. त्यानंतर सुनयना ही भूमिका साकारतेय. सुनयनाने मालिकेत एंट्री घेतल्यानंतर चाहत्यांनी तिच्या अभिनयाला पसंती दर्शवली. आपल्या अभिनयाने तिने सर्वांची मने जिंकली होती.

सुनयनाचा जन्म १९ जुलै, १९८६ रोजी झाला. तिने स्टार प्लसवरील मालिका संतानमधून टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

Back to top button