समीर वानखेडेंच्या यशामागे ‘ही’ व्यक्ती? क्रांती रेडकर हिने केला खुलासा | पुढारी

समीर वानखेडेंच्या यशामागे 'ही' व्यक्ती? क्रांती रेडकर हिने केला खुलासा

पुढारी ऑनलाईन  : राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) संचालक समीर वानखेडे ( sameer wankhede) कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील छापेमारी आणि ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या अटकेमुळे चर्चेत आले आहेत. आर्यन खान सध्या क्रूझवर पकडलेल्या इतर आरोपींसह न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या जामिनाची सुनावणी बुधवारी होणार आहे. या प्रकरणामुळे समीर वानखेडे (sameer wankhede ) यांची रिअल लाईफमध्ये ‘सिंघम’ म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. याच दरम्यान समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने त्याच्या यशामागे कोणाचा हात आहे? याचा खुलासा केला आहे.

क्रांती रेडकर हिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. या मुलाखतीमध्ये तिने समीर यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. या मुलाखतात क्रांती म्हणते की, एक पत्नी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. ते फार कष्टाळू आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेक प्रकरणे हाताळली आहेत. पण हे प्रकरण बॉलिवूडशी संबंधित असल्यामुळे सध्या जास्त चर्चा सुरु आहे.

यापुढे क्रांतीने सांगितले की, जेव्हा समीर एखादे प्रकरण हाताळतात. तेव्हा मी त्यांच्या कामामध्ये येत नाही. त्यांना त्यांचं काम करू देते. मी घराकडे लक्ष देते. ते केवळ २ तास झोपतात. सातत्याने त्यांना फोन सुरू असतात, त्यावेळी मी कोण, काय, कशासाठी असे प्रश्न विचारत नाही.

मला माहित आहे की, त्यांच्यावर कामाचा किती भार असतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाकडे व्यवस्थित लक्ष देता येईल. जेव्हा ते त्यांच्या सिक्रेट ऑपरेशनवर काम करतात. तेव्हा घरीत कुठलीही माहिती देत नाहीत. आणि आम्हीही त्यांना विचारत नाही. मी त्यांच्या कामाचा आदर करते. ते याबाबत कधीच तक्रार करत नाहीत.

समीर वानखेडेंच्या यशामागे वडिलांचा हात

यासोबत क्रांतीने समीरचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे सुद्धा पोलीस अधिकारी असून सध्या ते सेवेतून निवृत्त झाले आहेत. जेव्हा कधी समीर यांना अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा ते आपल्या वडिलांशी संपर्क साधतात. पहिल्यादां समीर त्याचा सल्ला घेतात. ते समीरच्या पाठिशी एखाद्या प्रकाशासारखे उभे आहेत. याशिवाय ते नेहमीच त्यांना मोलाचा सल्ला देखील देत असल्याचे तिने या मुलाखतीत म्हटले आहे.

याआधी एनसीबीचे मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान दोन पोलिसांकडून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली होती.

समीर वानखेडे यांनी विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा यांच्या घरावर छापे टाकले आहेत. याशिवाय गायक मिका सिंगला बेकायदेशीररित्या परदेशी चलन बाळगल्याप्रकरणी मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्याची कार्यवाही त्यांनीच केलं होतं.

हेही वाीचलंत का?

Back to top button