Sara Ali Khan : साराला ‘आशिकी ३’ करायला आवडेल, पण… | पुढारी

Sara Ali Khan : साराला 'आशिकी ३' करायला आवडेल, पण...

पुढारी ऑनलाईन : मला ‘आशिकी ३’ हा चित्रपट करायला आवडेलच. मात्र अद्याप मला यासाठी विचारणा झालेली नाही. बॉलीवूडची स्टार कीड सारा अली खानने ( Sara Ali Khan )  ही प्रतिक्रिया एका खासगी वाहिनीला दिली आहे.

‘आशिकी २ च्या यशानंतर आता निर्मात्यांनी ‘आशिकी ३’ प्रेक्षकांसाठी घेऊन येण्याची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनची वर्णी लागली आहे. मात्र, अभिनेत्रीसाठी अजून शोध सुरू आहे. मध्यंतरी कार्तिक आर्यन व साराच एका फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. मात्र अभिनेत्रीने यावर तिला विचारणाच झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

सारा अली खान सोशल मीडियावर सक्रिय असते. कधी शुभमन गिलमुळे, तर कधी चित्रपटांमुळे ती चर्चेत येत असते. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतबरोबर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने कार्तिक आर्यनबरोबर ‘लव्ह आजकल’ हा चित्रपट केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मात्र, या जोडीची चर्चा झाली. ब्रेकअपनंतर हे दोघे पुन्हा आता ‘आशिकी ३’मध्ये झळकणार, अशी चर्चा असताना सारा अली खानने यावर खुलासा केला आहे.

Back to top button