इंडियन आयडल- मराठी : 'अजय अतूल' परीक्षक म्हणून दिसणार - पुढारी

इंडियन आयडल- मराठी : 'अजय अतूल' परीक्षक म्हणून दिसणार

पुणे; पुढारी ऑनलाईन : सोनी मराठी पहिल्यांदाच घेऊन येत आहे इंडियन आयडल – मराठी! कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इंडियन आयडल- मराठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

अंकित मोहन स्टारर ‘बाबू’च्या चित्रीकरणाला सुरुवात

या इतक्या दर्जेदार कार्यक्रमाचे परीक्षण संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल करणार आहेत. पुण्यात नारायण पेठ येथे भित्तीचित्राद्वारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली.

अभिनेत्री सायली चौधरी हिचे ‘प्रेमात तुझ्या’ गाणं पाहिलं का?

यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर अमित फाळके आणि फ्रीमेन्टल निर्मिती संस्थेचे केशव कौल उपस्थित होते.

Aryan Khan Arrested : एनसीबीची छापेमारी; आणखी एकाला घेतलं ताब्यात!

आपल्या संगीताचं गारुड या जोडीनं महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या मनावर घातलं आहे. या जोडीनी आपल्या सांगितिक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली. पुण्यात या भित्तीचित्राद्वारे त्या दोघांचं नाव या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आलं.

मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच आशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे शहरात या भित्तीचित्राची सगळीकडे चर्चा आहे.

शहराच्या मधोमध असलेलं हे चित्रं पुणे शहरवासीयांचं लक्ष वेधून घेतंय. निखिल सतिश खैरनार या कलाकारांनी हे भित्तीचित्र काढलं आहे.

‘अजय-अतुल’ या जोडीने आत्तापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. त्याचप्रमाणे इंडियन आयडल या मंचानंही संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत.

हा मंच आता सोनी मराठी वाहिनीनी मराठीमध्ये आणला आहे. या एवढ्या मोठ्या मंचाला ‘अजय-अतूल’ हे परीक्षक म्हणून मिळाले आहेत.

फ्रीमेन्टल या निर्मिती संस्थेनी या कार्यक्रमाची निर्मिती केलीय. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सोनी लिव्हवर सुरू झाल्या आहेत. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

‘इंडियन आयडल – मराठी’ लवकरच पाहा, सोनी मराठी वाहिनीवर!

हेही वाचलंत का? –

नट्टू काका : ‘तारक मेहता’च्या घनश्याम नायक यांचे कॅन्सरने निधन

‘फ्री हिट दणका’ या दिवशी होणार रिलीज

कडूस परिसरात बिबट्या सीसीटीव्हीत कैद

Back to top button