महेश मांजरेकर यांचा गोडसे सिनेमा : गांधी जयंतीलाच आलेला टीझर वादात | पुढारी

महेश मांजरेकर यांचा गोडसे सिनेमा : गांधी जयंतीलाच आलेला टीझर वादात

पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठी, हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा आगामी गोडसे सिनेमा वादात सापडला आहे. गांधी जयंतीदिनीच त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर सिनेमाचा टिझर शेअर केला असून अनेकांनी त्यावर टीका केली आहे. हा टीझर म्हरजे मानवी मनाची काळी विकृत बाजू असल्याचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी म्हटले आहे.

संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त या सिनेमाची घोषणा केली आहे.
महेश मांजरेकर याने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, आजपर्यंतच्या सर्वात घातक जयंतीच्या शुभेच्छा. अशा प्रकारची कथा पाहण्यासाठी तयार व्हा, याआधी तुम्हाला कुणी सांगण्याचे धाडस केले नाही.

नथुराम गोडसेची कथा नेहमी माझ्या ह्रदयाजवळ आहे. अशा प्रकारच्या सिनेमाचे समर्थन करण्यासाठी मोठी हिंमत हवी होती. मी नेहमी कठीण विषय कुठलीही तडजोड न करता सांगण्याचे धाडस करतो. येथे हा नियम फिट बसतो. गोडसे हा गांधीजींना गोळी मारणारा यापलिकडे लोकांना गोडसेबाबत फारसे काही माहीत नाही. त्याची कथा सांगताना आम्ही कुणाचे समर्थन करणार नाही आणि कुणाविरुद्ध बोलणारही नाही. काय खरे काय खोटे हे आम्ही प्रेक्षकांवर सोडत आहोत.’

या पोस्टवर समिश्र प्रतिक्रिया असून सामाजिक क्षेत्रातून मांजरेकरवर प्रचंड टीका होत आहे.

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर सुरक्षिततेची पोलिस अधीक्षकांकडून पाहणी

मांजरेकर यांचा आगामी गोडसे सिनेमा वादात

माजी सनदी अधिकारी आणि साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून त्यात त्यांनी मांजरेकर यांची ही विकृत बुद्धी असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘गांधी जयंतीला महेश मांजरेकरची नव्या ‘गोडसे’ चित्रपटाची घोषणा म्हणजे त्याच्या विकृत मन आणि बुद्धीची ही परिसीमा म्हणाली पाहिजे. आणि त्या सिनेमाचा टिझर- तो तर आणखी मानवी मनाची काळी विकृत बाजू दाखविणारा.
शेम टू महेश मांजरेकर! त्रिवार शेम!

मी बापूंची सहिष्णुता व संविधान प्रणित अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानतो ,तरीही बापू जयंती दिनी असा विकृत प्रतिभेचा?( याला प्रतिभा म्हणायची का हा सवाल आहेच म्हणा!)आविष्कार कसा पटवून घेऊ? कुणाही विवेकी व माणुसकी मानणाऱ्या सामान्य माणसालाही हे पटणारे नाही.

मांजरेकरची पोस्ट वाचता गोडसेचे उदात्तीकरण करण्याची त्याची मनीषा लपून राहत नाही. शरद पोंक्षे प्रभूतीच्या पंगतीत एक जगवंद्य महात्म्याच्या खुन्याची बाज रुपेरी पडद्यावर एक विदूषकी चाळे करणाऱ्या सो कॉल्ड ‘बिग बॉस’ मांजरेकरची भर पडली. हे राम!

corona nashik : कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर मुलीसह पत्नीची आत्महत्या

मी येशू ख्रिस मसीहा सारखा “देवा त्याला माफ कर. तो काय पाप करतोय हे त्याला माहित नाही” असं मी म्हणण्याइतका क्षमाशील नाही!
मी आपला आपल्या संत तुकाराम महाराजांच्या अनुयायी आहे.‘भले तरी देऊ कासेची लंगोटी. नाठाळाच्या माथी हाणू काठी !’ असे आज सात्विक संतापाने म्हणतोय!

बापू, मला माफ करा. तुमच्यावर माझी असीम श्रद्धा व प्रेम आहे. तुमचा विचार हा आम भारतीयांचा विचार आहे असं मी मानतो. तुमच्या भारतात अशी विकृती का पुन्हा पुन्हा जन्मास येते? मला त्याला कितीही प्रयत्न केला तरी माफ करता येत नाही!

हेही वाचले का:

Back to top button