कोल्हापूर : अंबाबाई मंदिर सुरक्षिततेची पोलिस अधीक्षकांकडून पाहणी | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर सुरक्षिततेची पोलिस अधीक्षकांकडून पाहणी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर अधीक्षक तिरूपती काकडे यांनी शनिवारी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरसह परिसरातील सुरक्षिततेची पाहणी केली. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशीच अंबाबाई मंदिराचा दरवाजा खुला होणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेवून सुरक्षिततेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरसह परिसरात सोशल डिस्टन्सन, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर बंधनकारक असल्याचेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. सुचनांचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कारवाईच्या सुचनाही जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नवरात्रौत्सव काळात महाराष्ट्रासह देशाच्या काना कोपऱ्यातून भाविकांची गर्दी लक्षात घेवून मंदिरसह परिसरात ठिकठिकाणी साध्यावेशातील पोलिस पथके नियुक्तीच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर सुरक्षिततेची पोलिस अधीक्षकांकडून पाहणी
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर सुरक्षिततेची पोलिस अधीक्षकांकडून पाहणी

मंदिर परिसरासह गाभारा, प्रवेशद्वार, पार्किंग ठिकाणाचीही त्यांनी पाहणी केली. गर्दीत चोरट्यांचा सुळसुळाट होण्याची भितीही व्यक्त केली. पोलिसांची गस्त कडक करण्याची सुचना केली. गर्दीच्या काळात परिसरात वाहतूकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. असे ते म्हणाले. नवरात्रौत्सव काळात मंदिरसह परिसरात पोलिस उपअधीक्षकसह २ पोलिस निरीक्षक, ७ पोलिस उपनिरीक्षक, १७५ पोलिस, १५० गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. असेही अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी सांगितले. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव, जिल्हा विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी आदी उपस्थित होते.

Back to top button