

पुढारी ऑनलाईन डेस्क :अभिनेत्री मानसी नाईक काही महिन्यांपूर्वी लग्न बंधनात अडकली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आज ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिने आज एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मानसी नाईक लवकरच गुड न्यूज देणार आहे. तिने आज बेबी बंपसह फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी मानसी नाईकला ट्रोल केल आहे. तरी काहींनी हा फोटो म्हणजे पुढच्या प्रोजक्टचा असणार अस म्हटलं आहे. अनेकांनी या फोटोवर निगेटिव्ह कमेंट केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर बेबी बंपसह फोटो शेअर करत तिने 'लवकरच' अशी कॅप्शन दिली आहे.
मानसी नाईक प्रदीप खरेरा १९ जानेवारीला लग्नबंधनात अडकले. ते बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. प्रदीप खरेरा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तो मॉडेल व अभिनेताही आहे. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर रिल्स शेअर करत असतात.
मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरा हा इंटनॅशनल बॉक्स आहे. तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. त्याने अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स २०१८ चा तो विजेता आहे. तो आपले व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करतो.