Vijay Sethupathi : टेलिफोन बूथवर काम करायचा विजय सेतुपति | पुढारी

Vijay Sethupathi : टेलिफोन बूथवर काम करायचा विजय सेतुपति

पुढारी ऑनलाईन डेस्क : दरवर्षी अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन अनेक जण चित्रपट क्षेत्रात येतात. यातील काही जण नैराश्येतून परत माघारी फिरतात तर काहींची या क्षेत्रात टिकून राहण्याची कसरत सुरूच असते.(Vijay Sethupathi ) अभिनेता विजय सेतुपति यानेही अनेक वाईट प्रसंगांना तोंड देत चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले होते. एका सामान्य कुटुंबातील सेतुपतिने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होतं. सुरूवातीला अनेक छोट्या- मोठ्या भूमिका करणारा हा अभिनेता आज तमिळ चित्रपटात सुपरस्टार आहे. कठोर परिश्रम आणि जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते, हे विजय सेतुपतिने सिद्ध करून दाखवून दिले आहे. अभिनेता विजय सेतुपतिविषयी फार कमी लोकांना ही माहिती असावी की, तो पोटासाठी एकेकाळी टेलिफोन बूथवर काम करायचा. (Vijay Sethupathi)

विजयने सुरुवातीच्या काळात टेलिफोन बूथ ऑपरेटरपासून कॅशियर म्हणूनही काम केले. विजय सेतुपतीच्या घराची परिस्थिती बिकट होती. त्यामुळे काम करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने सुरुवातीच्या काळी टेलिफोन बूथ ऑपरेटर व कधी सेल्समन म्हणूनही काम केले. यासोबतच त्याने अभ्यास सुरू ठेवत कॉमर्स शाखेची पदवी घेतली. त्यानंतर काही काळ अकाऊंटंट म्हणून काम केले आहे. त्यानंतर जीवनात येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगाला तोंड देत त्याने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले. आज दक्षिणात्य चित्रपटात त्याने स्वतःची एक वेगळी क्रेझ तयार केली आहे.

छोट्याशा भूमिकेसाठी संघर्ष

विजय सेतुपतिने Koothupattarai चे पोस्टर पाहिलं आणि अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केला. पण, काम मिळवणं इतकं सोपं नव्हतं. विजय सेतुपतिलादेखील अभिनेता होण्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागली. तो जिथे ऑडिशन द्यायचा, तिथे आपले फोटो देऊन यायचा. परंतु, ते फोटो चित्रपट निर्मात्यांपर्यंत पोहोचत नसत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, विजय सेतुपतिला एका चित्रपटामध्ये ज्युनियर आर्टिस्टच्या भूमिकेसाठीही नकार देण्यात आला होता. इतकचं नाही तर त्याला अनेक चित्रपटांमधून रिप्लेसदेखील करण्यात आले होते. पण, विजय सेतुपतिने हिंमत नाही हारली.

या चित्रपटाने बदललं विजयचं भाग्य

विजय सेतुपतिला काहाही करून अभिनेता व्हायचंच होतं. त्याने सुरुवातीला टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. मालिकांसोबत त्याने चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर आणि ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केले. काही वर्ष हे काम सुरुच राहिलं. २०१२ मध्ये एक चित्रपट विजय सेतुपतिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. यावर्षी त्याचे तीन चित्रपट रिलीज झाले, ते सुपरहिटदेखील ठरले.

२०११ मध्ये विजय सेतुपतिला त्याच्या करिअरमधील पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका होती. Thenmerku Paruvakaatru असे चित्रपटाचे नाव होते. यावर्षी चित्रपटाने ३ नॅशनल ॲवॉर्ड जिंकले. त्यानंतर रिलीज झालेले त्याचे अनेक चित्रपट हिट ठरले. या चित्रपटांनी विजय सेतुपतिला वेगळी ओळख निर्माण करून दिली. आज तमिळ सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये विजय सेतुपतिचे नाव समाविष्ट आहे.

Back to top button