पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार राम चरण (Ramcharan) सध्या त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'RRR' मुळे खूप चर्चेत आहे. दिग्गज दिग्दर्शक एस राजामौली यांच्या चित्रपटाचे जगभरात कौतुक होत आहे. सगळीकडे 'आरआरआर'चा जादू पाहायला मिळतेय. या चित्रपटातील गाण्याला 'Natu Natu' ला गोल्डन ग्लोब ॲवॉर्ड २०२२ ने सन्मानित करण्यात आले आहे. साऊथच्या टॉप अभिनेत्यांमध्ये राम चरणचा समावेश होतो. 'RRR' स्टार आपल्या ॲक्टिंगसोबत आपली स्टाईल आणि लक्झरी लाईफसाठीही ओळखला जातो. (Ramcharan)
सुपरस्टार रामचरणकडे एकापेक्षा एक लक्झरी कार आहेत. त्याच्या गॅरेजमध्ये कारचे एकापेक्षा एक कलेक्शन आहे. यापैकी सर्वात खास म्हणजे- त्याची आवडती रोल्स रॉयस कार. या चमचमत्या कारची किंमत जवळपास ७ कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, रामचरणने आपली 'रोल्स रॉयस कार' वडिलांना त्यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त भेट दिली होती.
साऊथचा सुपरस्टार राम चरणचा जन्म २७ मार्च, १९८५ रोजी रोजी चेन्नई येथे झाला. त्याने २००७ मध्ये पुरी जगन्नाथ यांच्या 'चिरुथा' चित्रपटातून पदार्पण केले. त्याने २०१६ मध्ये 'कोनिडेला प्रोडक्शन कंपनी' नावाने आपले प्रोडक्शन हाऊस उघडले. रामचरण हा एका विमान कंपनीचा मालकदेखील आहे. याशिवाय हैदराबाद पोलो रायडिंग क्लब नावाची पोलो टीमही आहे.
हैदराबादच्या प्राईम लोकेशनवर त्याचा कोटींचा बंगला आहे. राम चरणचं घर खूप सुंदर आहे. रिपोर्टनुसार, या बंगल्याची किंमत ३० कोटींची आहे. त्याचे घर अनेक परदेशांतून खरेदी केलेल्या वस्तूंनी सजवलेले आहे. त्याचं घर अलिशान तर आहेच शिवाय घराच्या बाल्कनीतून सुंदर दृश्य दिसतं. रामचे फॅन फॉलोइंगदेखील त्याचे सुपरस्टार वडील चिरंजीवीसारखं आहे. फॅन्स त्याच्या अभिनयाशिवाय त्याच्या फिटनेस आणि स्टाईलचे वेडे आहेत. चित्रपटांशिवाय तो ब्रँड एंडोर्समेंट्स आणि पर्सनल इन्वेस्टमेंट्समधून पैसे कमावतो.
ॲक्टिंग आणि स्टाईलने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या राम चरणचे स्वत:चे एक प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. त्याचे हे प्रोडक्शन हाऊस हैदराबादमध्ये आहे. या प्रोडक्शन हाऊसमध्ये 'कैदी नंबर १५०', 'आचार्य' आणि 'गॉडफादर' यासारखे सुपरहिट चित्रपट बनवले आहेत.