RRR movie : हॉलिवूडला भारतीय चित्रपटांची भूरळ, ‘अवतार’ फेम जेम्स कॅमेरून यांच्याकडून ‘आरआरआर’चं कौतुक | पुढारी

RRR movie : हॉलिवूडला भारतीय चित्रपटांची भूरळ, ‘अवतार’ फेम जेम्स कॅमेरून यांच्याकडून ‘आरआरआर’चं कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क : एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ ( RRR movie ) चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब आणि चित्रपटाला क्रिटिक्स चॉइस पुरस्कार मिळवत भरघोस यश संपादन केलं आहे. या चित्रपटाची चर्चा बॉलिवूडसोबत हॉलिवूड केली जात आहे. याच दरम्यान ‘अवतार’ फेम हॉलिवूड अभिनेता जेम्स कॅमेरून यांनी ‘आरआरआर’ चित्रपटाचे भरभरून कौतुक केलं आहे.

‘क्रिटिक्स चॉइस पुरस्कार’ च्या सोहळ्यात अवतार’ फेम जेम्स कॅमेरून आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांची भेट झाली. या भेटीदरम्यान जेम्स याने ‘आरआरआर’ चित्रपट ( RRR movie) दोनदा पाहिला असून त्याच्या सर्व टीमचे भरभरून कौतुक केलंय. याशिवाय त्यांनी त्याच्या पत्नीलाला ‘आरआरआर’ पाहण्यास सांगत तिच्यासोबतदेखील चित्रपट पाहिला असल्याचे सांगितले. राजामौली यांनी स्वत: टविट्टरवर जेम्स यांच्याशी गप्पा मारतानाचे फोटो शेअर केले आहेत.

या ट्विटमध्ये ‘हॉलिवूड अभिनेता जेम्स कॅमेरूनने राजमौली यांचा ‘आरआरआर’ पाहिला. आणि त्यांना तो इतका आवडला की, त्यानी त्याच्या पत्नी सुझीला देखील चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. एवढ्यावर न थांबता दोघांनी पुन्हा तो चित्रपट सोबत पाहिल्याचेही त्यांनी सांगितले. 🙏🏻🙏🏻, सर मला अजूनही विश्वास बसत नाही की, तुम्ही या चित्रपटाचे विश्लेषण करण्यासाठी आमच्यासोबत १० मिनिटे चर्चा केली. मी जगात अव्वल आहे. धन्यवाद दोघांचे 🥰🥰🤗🤗. असे ही म्हटलं आहे.

हे ट्विट सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह अनेक कलाकारांनी आरआरआरचे कौतुक केलं आहे. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला आहे. या चित्रपटाने जागतिक पातळीवर १२०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button