Kareena Kapoor : आता म्हणून दाखवा, करिनाचं वजन वाढलंय! (Video) | पुढारी

Kareena Kapoor : आता म्हणून दाखवा, करिनाचं वजन वाढलंय! (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्काने नुकताच तिचा वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये करिना दिलजीत दोसांझच्या गाण्यावर वर्कआऊट करताना दिसत आहे. यात करिनाच्या आलिशान घराची झलकही पाहण्यास मिळत आहे. करिनाने काळ्या रंगाचा टॉप, ग्रे पँट आणि पांढरा स्नीकर्स घातला आहे. यामध्ये ती खूपच फिट दिसत आहे. करिना पायर्‍या चढून येते आणि योगा मॅटवर व्यायाम करण्यास सुरुवात करते. करिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळत आहेत. तुम्ही तुमच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहात का? असे एका युजर्सने म्हटले आहे, तर आम्हाला तुम्हाला लवकरच स्लिम आणि फिट पाहायला आवडेल, असे दुसरा युजर म्हणाला. तुम्हीच खर्‍या क्विन आहात, असे आणखी एका युजर्सने म्हटले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ANSHUKA YOGA (@anshukayoga)

Back to top button