The Vaccine War: विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटात साऊथ स्टार, कंतारामध्ये केला होता अभिनय | पुढारी

The Vaccine War: विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटात साऊथ स्टार, कंतारामध्ये केला होता अभिनय

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आहे. अभिनेता ऋषभ शेट्टीने यात मुख्य भूमिका साकारली आणि त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात ऋषभसोबत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सप्तमी गौडा (The Vaccine War) बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी चित्रपटातून सप्तमी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (The Vaccine War)

या चित्रपटाचे नाव ‘द व्हॅक्सिन वॉर’ असे आहे. अग्निहोत्रींनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत सप्तमीच्या भूमिकेविषयी माहिती दिली आहे. ‘या प्रोजेक्टचा एक भाग बनल्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. या संधीसाठी विवेक अग्निहोत्रींचे आभार’, असे ट्विट सप्तमीने केले आहे.

‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटातील तुझी भूमिका अनेकांच्या हृदयाला स्पर्श करणारी असेल, त्यावर विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर 11 विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

Back to top button