Urfi Javed Tweet : उर्फी जावेद कोणाला म्‍हणतेय, “आमच्यापासून दूर रहा…” | पुढारी

Urfi Javed Tweet : उर्फी जावेद कोणाला म्‍हणतेय, "आमच्यापासून दूर रहा..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या हटके फॅशनमूळे नेहमी चर्चेत असते. ती आपल्या अधिकृत सोशल मीडियावर सातत्याने फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. गेले काही दिवस ती पुन्हा चर्चेत आली ती भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तिच्याबद्दल घेतलेली भूमिका. आज तिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर  ट्विट (Urfi Javed Tweet) करत , “आमच्यापासून दूर रहा…”  म्हटलं आहे. तिने प्रत्यक्ष कोणाचं नाव घेतलेलं नाही. त्‍यामुळे तिने कोणाला उद्देशून ट्विट केले आहे, याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

Urfi Javed

Urfi Javed Tweet : आनंदी व्हा किंवा दुःखी व्हा…

गेले काही दिवस भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी घेतलेल्या आक्षेपामूळे उर्फी जावेद चर्चेत आहे. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडिया वॉर सुरु आहे. आज पुन्हा एकदा उर्फीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर  एक ट्विट केले आहे. यामध्ये तिने म्हटलं आहे की,”आनंदी व्हा किंवा दुःखी व्हा…आमच्यापासून दूर रहा…” या ट्विटमध्ये तिने  कोणाचही  नाव घेतलेले नाही; पण  ट्विटर युजर्सने चित्रा वाघ यांना उद्देशून कमेंट केल्या आहेत. एक युजर म्हणतं आहे की, सासू-सुनेचं भांडण, तर एकजण म्हणतं आहे की,

urfi javed
urfi javed

काय आहे चित्रा वाघ आणि उर्फी जावेद वादाचे कारण 

गेले काही दिवस भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि आपल्या फॅशनमूळे नेहमी चर्चेत असणारी उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात वाद सुरु आहे. सोशल मिडियावरुन दोघीही एकमेकींना आरोप-प्रत्यारोप करत आहेत. हे सोशल वॉर गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. याची सुरुवात चित्रा वाघ यांनी,” शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही. तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.” असं ट्विट केले होते. इथून दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली.

हेही वाचा

 

 

Back to top button