Ntr jr : मृत्यूच्या जबड्यातून परत आलाय ज्युनियर एनटीआर | पुढारी

Ntr jr : मृत्यूच्या जबड्यातून परत आलाय ज्युनियर एनटीआर

पुढारी ऑनलाईन डेस्क : देश-विदेशातही प्रदर्शन करून मोठा गल्ला जमवणाऱ्या आरआरआर (RRR) चित्रपटाने मोठी बाजी मारली आहे. एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कारावर (Golden Globe Awards 2023) मोहर उमटवली आहे.

या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, रामचरण तेजा, अजय देवगण आणि आलिया भट्ट (Ntr jr) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुम्हाला माहितीये का? ज्युनियर एनटीआर त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतो. सकाळी उठल्यापासून त्याची दिनचर्या खूप व्यस्त असते. एका चित्रपट निर्मात्याचा मुलगा असूनही तो साधेपणाने जगतो. म्हणूनचं तो मोठा स्टार असूनही त्‍याचा साधेपणा चाहत्‍यांना भावतो.

चित्रपटाच्या सेटवर वेळेत पोहोचणं असो वा आपल्या भूमिकेसाठी मेहनत, यामध्‍ये नेहमीच तो अग्रेसर असतो. तुम्हाला माहिती आहे का, ज्युनियर एनटीआर हा मृत्यूच्या जबड्यातून परत आला आहे. ज्या ठिकाणी त्याचे वडील आणि भावाचा अपघात झाला होता, त्याठिकाणी ज्युनियर एनटीआरच्या (Nandamuri Taraka Rama Rao) कारचाही अपघात झाला होता. जाणून घेऊया त्याच्याविषयी. (Ntr jr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

प्रत्येक चित्रपट यशस्वी करणाऱ्या ज्यु. एनटीआरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं. तुम्हाला माहितीये का, साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर एनटीआरचे वडील नंदमूरी हरिकृष्णा यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. आंध्र प्रदेशात कवली येथे एका लग्नसमारंभाला जाताना नंदमूरी यांच्या कारचा अपघात झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात त्याच जागी झाला, जिथे काही वर्षांपूर्वी नंदमूरी यांचा मोठा मुलगा राम नंदमूरीचाही कार अपघातात मृत्यू झाला होता.

जेथे भाऊ-वडिलांचा झाला होता मृत्यू, तेथेच Jr NTR चाही अपघात

नंदमूरी हरिकृष्णा यांचा मुलगा राम नंदमूरी एक चित्रपट निर्माता होते. अकूपामु येथे त्‍यांच्‍या कारला अपघात झाला होता. वडील आणि भावाप्रमाणेच एनटीआर ज्यु.चा देखील याच मार्गावर अपघात झाला होता. सुदैवाने तो या अपघातातून बचावला हाेता. २००९ मध्ये जेव्हा एनटीआर ज्यु. एका कार्यक्रमातून परत येत होता. तेव्हा त्याच्या कारचा अपघात झाला. या दुर्घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली होती.

एनटीआर ज्युनियर विषयी माहितीये का?

साऊथचा ॲक्शन स्टार ज्युनियर एनटीआरचा जन्म २० मे, १९८३ रोजी हैदराबाद येथे झाला. आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज अभिनेते एनटी रामारावचा नातू म्हणून त्याची ओळख आहे. ॲक्शन, डान्स आणि अभिनय या तिन्ही गोष्टींमध्ये एनटीआर ज्युनियरचा दबदबा आहे. यासाठीच त्याला ‘हिटस्टार’ देखील म्हटलं जातं.

बालपणापासून अभिनय

ज्युनियर एनटीआरने बालपणापासून चित्रपट करिअरची सुरुवात केली.  आजोबांनी दिग्दर्शित केलेल्‍या ‘ब्रह्मर्शी विश्वामित्र’मध्ये त्याने  बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. एनटीआर ज्युनियरचं खरं नाव ‘तारक’ असे आहे, हे खूप कमी लोकांना माहिती असेल. २००१ मध्ये ‘स्टुडंट नंबर १ ‘चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली होती.

टीव्हीवरही  हिट एनटीआर ज्युनियर

एनटीआर ज्युनियरने टीव्हीवर बिग बॉस (तेलुगु) शो होस्ट केले आहे. २०१७ मध्ये हा शो सर्वात हिट शोचाचा एक भाग होता. एनटीआर ज्युनियरचे नाव फोर्ब्स इंडिया सेलेब्रिटीजच्या यादीत दोन वेळा समाविष्ट होते. एनटीआर ज्युनियर ॲक्शन चित्रपटांतील वेगवेगळ्या अवतारासाठी ओळखला जातो.

मृत्यूच्या जबड्यातून परत आलाय ज्युनियर एनटीआर

२००९ मध्ये निवडणुकीच्या प्रचारावेळी एनटीआर ज्युनियर खूप जखमी झाला होता. अपघातातूनही तो बचावला  होता.

Golden Globe
Golden Globe – RRR Movie Naatu Naatu song composer m m keeravaani receives the honour

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

Back to top button