पुणे : कारागृहामध्ये शिकलेली भाषा राऊतांनी बंद करावी ; बावनकुळे यांचा सल्ला | पुढारी

पुणे : कारागृहामध्ये शिकलेली भाषा राऊतांनी बंद करावी ; बावनकुळे यांचा सल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खासदार संजय राऊत यांनी जेलमध्ये शिकून आलेली भाषा वापरणे बंद केले पाहिजे, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. ‘या सरकारचा मृत्यू जवळ आला आहे, फेब—ुवारीमध्ये सरकार पडेल,’ असा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. त्यासंदर्भात विचारणा केली असता, बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, ’राऊत यांनी दोन गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली म्हणजे, सकाळी झोपून उठल्यानंतर टोमणे मारणे बंद केले पाहिजे.  ठाकरे गटातील उर्वरित आमदार, खासदारही सोडून जातील, या भीतीपोटी सरकार जाणार असल्याचे राऊत म्हणत आहेत.’
’राष्ट्रवादी विरुद्ध खोट्या केसेस केल्या, तर आम्हाला आमची आयुधे वापरावी लागतील,’ असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते.

त्या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता, बावनकुळे म्हणाले, ’वापरा ना, काय वापरायची आहेत ते. अजितदादा तर कोणाला घाबरत नाहीत. मात्र, त्यांनी पूर्वइतिहास बघून घ्यावा. मलाही कोरोना काळात जेलमध्ये टाकले. पदावर असताना आपण कसे वागलो, आता कसे वागतो, याचे जुने व्हिडिओ अजित पवार यांनी काढून पाहावेत. त्यानंतर त्यांचे बोलणे सुधारेल.’बावनकुळे म्हणाले, की जी-20 ची बैठक यशस्वी करण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी भाजपने आज पुण्यात पक्षांतर्गत बैठक घेतली. या देशांमध्ये फळे, शेतमालाची निर्यात करण्यासाठी काय करता येईल, त्याचे नियोजन करणार आहोत.

बारामतीचा विकास म्हणजे संपूर्ण मतदारसंघाचा नाही

दौंड/राहू : सत्तेचा वापर कंत्राटदारांसाठी झाला. एकट्या बारामतीचा विकास म्हणजे संपूर्ण मतदारसंघाचा विकास होत नसल्याचे परखड मत या वेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते दौंड कृषी महोत्सव 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. कृषी प्रदर्शनाला भेट देणार्‍या शेतकर्‍यांकडून पैसे घेणार्‍यांवर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका या वेळी बावनकुळे यांनी केली. समाजातील एकाचे अश्रू पुसता आले तरी मोठं काम झालं असं मी समजतो. मागचे 15 वर्षे सत्ता उपभोगली. त्यांना पुण्यात पूल बांधण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना टि्वटच्या माध्यमातून सांगावं लागतंय, मग तुम्ही काय केलं अशी टीका बावनकुळे यांनी नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली.

Back to top button