Tunisha Sharma death : तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी शीझान खानच्या जामीन अर्जावर ९ जानेवारीला सुनावणी | पुढारी

Tunisha Sharma death : तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी शीझान खानच्या जामीन अर्जावर ९ जानेवारीला सुनावणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शीझान खानच्या जामीन अर्जावर वसई कोर्टाने स्थगिती दिली असून यावरील पुढील सुनावणी ९ जानेवारीला होणार आहे. (Tunisha Sharma death) शीझानच्या कुटुंबीयांनी त्याच्या जामीनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. शीझान तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत आहे. (Tunisha Sharma death)

दरम्यान, शीझान खानच्या वकिलाने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, ‘वसई, कोर्टात हजर करण्यापूर्वी शीझान खानने त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. तो म्हणाला होता की, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तो निर्दोष आहे, सत्यमेव जयते…

त्याचबोरबर शीझानच्या वकिलांनी त्याच्या मानसिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. तो स्वत:चे बरे वाईट करून घेऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते. शीझानची प्रकृती इतकी बिघडत चालली आहे, अशीही त्यांनी मागणी केली होती. त्याला समुपदेशन तसेच न्यायालयीन कोठडीदरम्यान सुरक्षा देण्याची मागणीदेखील वकिलांनी केली होती.

Back to top button