Kiran Mane : किरण मानेंची वोटिंगसाठी हटके पोस्ट, सुरेखा कुडचीने दिला पाठिंबा (Videos) | पुढारी

Kiran Mane : किरण मानेंची वोटिंगसाठी हटके पोस्ट, सुरेखा कुडचीने दिला पाठिंबा (Videos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी म्हंटलं की, आपल्या सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचते. मग पर्व कधी सुरु होणार? सदस्य कोण असणार? सिझनच घर कसं असेल? आणि बरंच काही…आता संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत आहे ते म्हणजे या पर्वाचा महाविजेता कोण ठरणार याची. अखेर तो क्षण आला. १०० दिवसांपूर्वी १६ सदस्यांसोबत या रोमांचक प्रवासाची सुरुवात झाली आणि आता घरात उरले आहे टॉप ६ सदस्य.  (Bigg Boss Marathi Grand Finale) आता या सदस्यांपैकी एक अभिनेते किरण माने (Kiran Mane) होय. त्यांनी प्रेक्षकांना वोटिंगसाठी खास पोस्ट केलीय. त्याचबरोबर, व्हिडिओ करून सर्वांना वोटिंग देण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी किरण मानेंना पाठिंबा दिलाय. त्यांनी एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केलाय. (Kiran Mane)

किरण मानेंनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय-‘बिग बॉसच्या घरातल्या या आपल्या खऱ्या माणसासाठी वोट करताय नव्हं? प्रत्येकानं ९९ येळा वोट करून १००% ताकद लावा..! आपल्या या वाघाच्या निडर खेळीमुळे तो इथवर आला आहे. तेव्हा आता आपल्या प्रेमामुळे आणि आपण केलेल्या वोटिंग मुळेच तो ट्रॉफी पर्यंत पोहचू शकतो. वोटिंग लाईन ही शनिवार दुपारी १२.०० वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. तेव्हा लावा ताकद..! आन होवून जाऊ दे… जाळ आन धूर संगटचं..!’

किरण माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत आभार मानले आङेत. किरण यांनी लिहिलंय- ‘अभिनेत्री @surekha.kudachi यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आपल्या या वाघाच्या निडर खेळीमुळे तो इथवर आला आहे. तेव्हा आता आपल्या प्रेमामुळे आणि आपण केलेल्या वोटिंग मुळेच तो ट्रॉफी पर्यंत पोहचू शकतो. वोटिंग लाईन ही शनिवार दुपारी १२.०० वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. तेव्हा लावा ताकद..! आन होवून जाऊ दे… जाळ आन धूर संगटचं..!’

दरम्यान, राखी सावंत हिची घरात एन्ट्री झाली आणि तिने एकच धुमाकूळ घातला. किरण माने आणि राखी यांचा एकदेखील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून नेटकरी नाराज झाले. नेटकरी म्हणाले की, केवळ टीआरपीसाठी हे सगळं करताय. लोकांच्या हुनरला इथं value नाहीये फक्त तुम्हाला तुमच्या मनाचे लोक पुढ घेऊन जायचेत . ते वोटिंग बंद करा पहिला. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं की-‘एकाने बंद करा रे हा फालतू पणा अजून किती लोकांना हे दाखवून फसवणार.’

सदस्य अगणिक टास्क आणि अडचणींना सामोरे गेले. कधी कधी घरच्यांच्या आठवणीने डोळे पाणावले तर कधी सदस्य घराबाहेर गेला ही गोष्ट मनाला चटका लावून गेली. हे घर अशा अनेक क्षणांचे साक्षीदार राहिले आहे. आता हेच घर निरोप घेण्याच्या वाटेवर आहे. कारण, आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार असला तरीदेखील हे नातं मात्र अधिक दृढ झाले आहे यात शंका नाही. बिग बॉस मराठी सीझन ४ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. आता या TOP ६ मधून कोणता सदस्य ठरणार बिग बॉस मराठी सिझन ४ चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. बिग बॉस मराठी सीझन चौथाचा Grand Finale ८ जानेवारी रोजी संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर पार पडणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bigg Boss Marathi (@bbmarathi)

Back to top button