पिंपरी : लोखंडी जाळ्यांमुळे गुदमरला झाडांचा श्वास | पुढारी

पिंपरी : लोखंडी जाळ्यांमुळे गुदमरला झाडांचा श्वास

नवी सांगवी : वृक्ष लागवड करताना संरक्षण म्हणून रोपाभोवती संरक्षण जाळी लावली जाते. मात्र, झाडे मोठी झाली की त्याच जाळ्यांमुळे झाडांना इजा पोहोचत असून, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरातील अशा झाडांच्या जाळ्या काढण्याची मागणी केली जात आहे.
पालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने रस्त्याच्याकडेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड केली जाते. त्यामुळे वृक्षांना संरक्षण देण्यासाठी उद्यान विभागाकडून संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

परंतु, ही झाडे खूप मोठी झाली आहेत. झाडाच्या बुंद्यामध्ये लोखंडी जाळ्या घुसलेल्या आहेत. काही ठिकाणी जाळ्या तुटलेल्या आहेत. मोठ्या झाडांना आता अशा संरक्षक जाळ्यांची आवश्यकता नाही. नवी सांगवी पिंपळे आणि गुरव परिसरातील तारेच्या कुंपण जाळीमुळे अनेक मोठ्या झाडांना इजा पोहोचत आहे. या जाळ्या काढल्या तर झाडांची वाढ होऊन झाडे मोकळा श्वास घेतील. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने नवी सांगवी परिसरात असणार्‍या झाडांच्या बुंद्यामध्ये घसलेल्या लोखंडी जाळ्या त्वरित काढून टाकाव्यात. अशी मागणी आदी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

 

 

Back to top button