Malaika 60 Pics : न्यू ईअरला मोठा धमाका, मलायका-अर्जुन स्टायलिश लूकमध्ये स्पॉट | पुढारी

Malaika 60 Pics : न्यू ईअरला मोठा धमाका, मलायका-अर्जुन स्टायलिश लूकमध्ये स्पॉट

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे लव्ह बर्ड अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सोबत (Malaika 60 Pics) न्यू ईअर सेलिब्रेशन करून मुंबईत परतले आहेत. नुकताच दोघांना एकत्र विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. दोघेही सायलेंट मूडमध्ये कॅमेराबद्ध झाले. असे असले तरी मलायका-अर्जुनने नव्या वर्षाचे स्वागत धमाकेदार केले आहे. (Malaika 60 Pics) दोघेही विमानतळावर स्पॉट झाले आहेत. या लूकमध्ये दोघे सिंपल पण स्टायलिश लूकमध्ये दिसले.

संबंधित बातम्या

मलायकाने ब्लॅक लायनिंग व्हाईट स्वेटशर्ट घातला होता. यासोबत तिने ब्लॅक लेदर पँट घातली होती. तर अर्जुन कपूरने ब्लू टी-शर्ट आणि ब्लॅक पँट असा पेहराव केला होता. त्याने टोपी आणि हातात ब्राउन बॅग घेतला होता. दोघांनी नव्या वर्षाचे स्वागत एकत्र केले होते. या दौऱ्याचा एक फोटो मलायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मलायका अर्जुन एका झाडाखाली उभे असाताना या फोटोमध्ये दिसत आहेत. मलायका अर्जुनला किस करताना दिसतेय. तिने हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर करत लिहिलंय-Hello 2023❤️ …. Love n light…..01.01.23. या दोघांच्या फोटोला फॅन्सनी खूप पसंती दिली होती.

दरम्यान, मलायकाने आज एक फास्टेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर तिने लिहिलंय-2022 in 60 photos ready ? यासोबतचं तिने The year that was in 60 photos ….. #bye2022hello2023✨♥️ अशीही कॅप्शन लिहिलीय.

या व्हिडिओमध्ये मलायकाचे बोल्ड फोटोज, व्हेकेशन टूर, अर्जुन कपूरसोबतचे फोटो आणि फोटोशूटचे काही फोटोज पाहायला मिळताहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

Back to top button