Share Market Today | शेअर बाजारावर चीनमधील कोरोनाचे सावट, सेन्सेक्स, निफ्टीत घसरण | पुढारी

Share Market Today | शेअर बाजारावर चीनमधील कोरोनाचे सावट, सेन्सेक्स, निफ्टीत घसरण

Share Market Today : चीनमध्ये कोरोना संसर्गाचा वेगाने फैलाव झाल्यामुळे आर्थिक वृद्धीला आणखी धक्का बसेल आणि जागतिक पुरवठा साखळीत अडथळा निर्माण होईल या चिंतेने मंगळवारी आशियाई शेअर बाजार घसरले. याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज मंगळवारी (दि.३) भारतीय शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी घसरून ६१ हजारांवर आला. तर निफ्टी १८,१७२ अंकावर व्यवहार करत आहे. झोमॅटोचे शेअर्स ३ टक्क्यांनी घसरले आहेत, तर पिरामल फार्मा शेअर्स ३ टक्क्यांनी वधारले आहेत.

आशियाई बाजारातही घसरण

आशियाई बाजारातही आज घसरण झाली. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.१५ टक्क्याने घसरला, तर चीनचा मुख्य शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.४४ टक्क्याने खाली आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक १.६ टक्क्यांनी घसरला. जपानचा निक्केई निर्देशांक ०.२ टक्क्यांनी घसरला. (Share Market Today)

विंडफॉल कर वाढवला

केंद्राने सोमवारी देशांतर्गत उत्पादित कच्चे तेल, एव्हिएशन टर्बाइन इंधन आणि हाय-स्पीड डिझेलवरील विंडफॉल कर वाढवला. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कच्च्या तेलावरील विंडफॉल कर सध्याच्या १,७०० रुपयांवरून २,१०० रुपये प्रति टन करण्यात आला आहे. सुधारित करवाढ ३ जानेवारीपासून लागू होत आहे.

देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून ७४३.३५ कोटींच्या शेअर्सची खरेदी

सोमवारी बीएसई सेन्सेक्स ३२७ अंकांनी वाढून ६१,१६८ वर, तर निफ्टी ९२ अंकांनी झेप घेऊन १८,१९७ वर बंद झाला होता. NSE वरील आकडेवारीनुसार, सोमवारी २ जानेवारी रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) २१२.५७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ७४३.३५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

Back to top button