Sonam Kapoor : सोनमचा रेड जलवा, मोकळी पाठ अन्... | पुढारी

Sonam Kapoor : सोनमचा रेड जलवा, मोकळी पाठ अन्...

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. ती आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने लाल रंगात हटके फोटोशूट करून चर्चेत आली आहे.

नुकतेच सोनम कपूरने आपल्या इंन्स्टाग्रामवर काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सोनम कपूरने भडक लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. याशिवाय तिने कमरेस काळ्या रंगाचा बेल्ट आणि पायात शूज घातले आहेत. यासोबत लाल रंगाची छोटी पर्सदेखील तिने कॅरी केली आहे.

या फोटोसोबत सोनमने थॉमस होलक्रॉफ्ट यांचे ‘प्रेम आणि लाल गुलाब लपवता येत नसल्याचे म्हटले आहे.’ या फोटोत सोनमची मोकळी पाठ दिसत असून तिच्या कानातले रिंग आकर्षाणाचा केंद्रबिदू ठरला आहे.

Sonam Kapoor

हे फोटो सोशल मीडियात व्हायरल होताच चाहत्यांनी कॉमेंन्टसचा पाऊस पाडत आहेत. यात एका युजर्सने ‘रेड रोझ’, ‘लालभडक दिलभडक’, ‘ग्लॅमरस’, ‘सुंदर’ आणि ‘अप्रतिम’. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘मला हा लूक खूपच आवडल्याचे म्हटले आहे.’ या कॉमेंन्टसोबत चाबत्यांनी प्रेमाचा आणि फायरचा ईमोजीदेखील शेअर केला आहे.

सोनम कपूर नेहमीच तिच्या स्टाईल, फॅशनमुळे चर्चेत असते. सोनमने नुकतेच लंडनमधील ब्लूमबर्ग क्विकटेकमध्ये ‘द बिझनेस ऑफ फॅशन’ शोच्या शुभारंभाला हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी खास करून, सोनमने हा लूक परिधान केला होता.

सोनमने २००७ साली संजय लिला भन्साळी यांच्या ‘सांवरिया’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यापुर्वी तिने राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. यासोबत सोनमने ‘थॅंक्यु’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘रांझणा’, ‘नीरजा’, ‘पॅडमॅन’, ‘भाग मिल्खा भाग’ आदी सुपरहिट चित्रपट केले.

याआधी सोनम कपूर तिची बहिण रिया कपूरच्या लग्नात स्पॉट झाली होती. यानंतर नेटकऱ्यांनी ती प्रेग्नेंन्ट असल्याची अफवा पसरविली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button