रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला
Published on
Updated on

नगर ; पुढारी वृत्तसेवा : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. गेल्या अनेक दिवसांपासून या अर्जावर सुनावणी सुरु होती.

३० नोव्हेंबर २०२० रोजी जरे यांची जातेगाव घाटात हत्या झाली होती. बाळ बोठे याने सुपारी देऊन जरे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आल्यावर पोलिसांनी तेलंगणा राज्यातून त्याला अटक केली होती.

सध्या पारनेर येथील कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे.

रेखा जरे हत्याकांड

या गुन्ह्याच्या संदर्भातील सर्व पुरावे पोलिसांनी न्यायालयासमोर आणले आहेत. जामीन मिळाला तर आरोपी पुन्हा फरार होऊ शकतो. कट रचून शांत डोक्याने त्यांने हत्या घडवून आणली आहे. त्याला जामीन देऊ नये, असा युक्तीवाद सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने बोठे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

दरम्यान, याच प्रकरणात कोठडीत असलेल्या फ़िरोज शेख याचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. बोठे याच्यावतीने न्यायालयात ॲड. महेश तवले, तर फिर्यादी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल ॲड. उमेशचंद्र यादव पाटील व ॲड. सचिन पटेकर यांनी बाजू मांडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news