sai tamhankar : व्हाईट शाॅर्ट वनपीसमध्ये सईला पाहून नेटकरी म्हणाले… | पुढारी

sai tamhankar : व्हाईट शाॅर्ट वनपीसमध्ये सईला पाहून नेटकरी म्हणाले...

मुंबई; पुढारी ऑनलाईन: नावाजलेली आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) हिची ओळख आहे. सई ताम्हणकर (sai tamhankar) हिचे नाव मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आहे. सईने पुन्हा आपले हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकतेच सईने डिझाइन केलेल्या पांढऱ्या (व्हाईट) रंगाच्या शाॅर्ट वनपीसमध्ये दिसली. या फोटोत सई खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. या फोटोला सईने ‘अह.. ‘अशी हटके कॅप्शनसोबत ईमोजी दिला आहे. या फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या पोझमध्ये सई दिसत आहे.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कॉमेंन्टसचा पाऊस पाडत आहेत. यात एका युजर्सने अरे वाह.., उफ., तर दुसऱ्या एकाने ”मीमी’ चित्रपटातील अभिनयाबद्दल तिचे कौतुक केले आहे.’ वेगवेगळ्या कॉमेंन्टससोबत चाहत्यांनी प्रेमाचा आणि फायर ईमोजीदेखील शेअर केला आहे.

याआधी सईने एका समुद्र किनाऱ्यावरील हटके फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोला चाहत्यांनी ‘खारट’ कॉमेंन्ट दिल्या होत्या.

सईने तिचे वजन कमी करण्यासाठीही प्रचंड मेहनत घेतली आहे.

मराठीसोबतच सईने हिंदीत देखील ‘हंटर’, ‘लव्ह-सोनियो’ सारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

काही चित्रपटात तिची बोल्ड भूमिका होत्या.

मराठमोळी सईचा बोल्ड लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. समांतर २ मधील तिची भूमिका महत्त्वाची ठरली होती.

सईने छोट्या पडद्यावरून सुरुवात केली होती. सईला ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली.

ती मूळची सांगलीची आहे. तिने मुंबईत आल्यानंतर प्रायोगिक नाटकांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवरदेखील अभिनय केलाय.

‘मीमी’ या चित्रपटात महत्त्‍वाची भूमिका

डिजीटल विश्वातदेखील तिने पाऊल ठेवले. मालिका, नाटके, चित्रपट आणि वेबसीरीज यासारख्या माध्यमातून ती चाहत्यांसमोर येतेय.

सईने नेटफ्लिक्सवरील ‘मीमी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली आहे.

या चित्रपटात पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button