Disha Patani Boyfriend: दिशाने लिफ्टमध्ये घेतली सेल्फी, नेटकरी म्हणाले- | पुढारी

Disha Patani Boyfriend: दिशाने लिफ्टमध्ये घेतली सेल्फी, नेटकरी म्हणाले-

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिशा पटानी आपल्या चित्रपटापेक्षा अधिक वैयक्तिक जीवनाविषयी चर्चेत राहते. (Disha Patani Boyfriend) सध्या ती तिचा जिम ट्रेनर अलेक्जेंडर एलेक्ससोबत स्पॉट होत आहे. दोघांना अनेकदा एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेराबद्ध करण्यात आलं आहे. परंतु, आता दिशाने अलेक्जेंडरसोबत काही फोटोज शेअर केली आहेत, जे व्हायरल होत आहेत. (Disha Patani Boyfriend)

दिशा आणि जिम ट्रेनर अलेक्जेंडर एलेक्स दोघांनीही रिलेशनशिपविषयी आतापर्यंत ऑफिशियली काहीही सांगितलेलं नाही. पण, ते दोघे वेळोवेळी स्पॉट होत असतात. आता दिशाने अलेक्जेंडरसोबत लिफ्टमध्ये सेल्फी घेतलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा किलर लुक दिसतोय. दिशाने लिफ्टमध्ये काढलेला फोटो पाहून युजर्सनी तिला टायगरची आठवण करून दिलीय. युजर्स म्हणाले-‘टायगर अभी जिंदा है’

दिशा -अलेक्जेंडर एलेक्स एकन पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीसाठी दिशाने ब्लॅक कलरचा कटआऊटवाला ड्रेस घातला होता. जो खूप रिवीलिंग आहे. हे पाहिल्यानंतर काही युजर्स हेदेखील म्हणत आहेत की, ‘हा ड्रेस उर्फी जावेदशी इंस्पायर्ड आहे.’ आणखी एकाने म्हटलं की ‘हेच जर उर्फीने घातलं असतं सर्व लोक ट्रोल करायला आले असते.’

अलेक्जेंडर जिम ट्रेनर, अभिनेता आणि मॉडल आहे. दिशाच्या या फोटोजवर टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने कॉमेंट केली आहे.

Back to top button