Abhishek Bachchan: अभिषेककडून सडेतोड उत्तर, अखेर तस्लीमा नसरीन यांनी ‘ते’ ट्विट केलं डिलिट | पुढारी

Abhishek Bachchan: अभिषेककडून सडेतोड उत्तर, अखेर तस्लीमा नसरीन यांनी 'ते' ट्विट केलं डिलिट

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते अभिषेक बच्चन सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतोच पण, त्यापेक्षाही अधिक ॲक्टिव्ह असतात त्याचे वडील, अभिनेते अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन आपल्या मुलाचे खूप कौतुक करतात. (Abhishek Bachchan) आताही त्यांनी आपल्या मुलांमध्ये कसे गुण आहे, याविषयीचे कौतुगोद्गार काढत ट्विट केले होते. या ट्विटला अनुसरूनच दुसरे ट्विट प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी केलं होतं. पण, या ट्विटला अभिषेक बच्चन यांनी प्रत्युत्तर देताच तस्लीमा नसरीन यांनी ते ट्विट डिलीट केलं. (Abhishek Bachchan)

लेखिका तस्लीमा नसरीन यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, अमिताभ बच्चन म्हणतात की, त्यांचा मुलगा सर्वात चांगला मुलगा आहे. त्याच्यात वडिलांप्रमाणे सर्व टॅलेंट आहे. जेव्हा हे ट्विट व्हायरल झालं तेव्हा अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया देत खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं.

तस्लीमा नसरीन (Taslima Nasreen) ट्विटरवर काही न काही ट्वीट करतात. त्यांनी लेटेस्ट ट्विट केलं, ज्यामध्ये लिहिलं होतं-अमिताभ बच्चन जी आपला मुलगा अभिषेक बच्चनवर खूप प्रेम करतात. ते म्हणतात की, त्याच्या मुलाकडे त्य़ांचे उपजत गुण आहेत. सर्व प्रतिभा वडिलांकडून मिळालीय. अभिषेक खूप चांगला आहे. पण, वाटत नाही की अभिषेकदेखील अमितजींइतके टॅलेंटेड आहे.

अभिषेकच्या ट्विटवर सुनील शेट्टींची प्रतिक्रिया

या ट्विटच्या रिप्लायमध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) ने कमेंट केलं. त्यांनी लिहिलं- आपण एकदम योग्य बोलत आहात मॅम. कुणीही त्यांचे टॅलेंट वा आणखी काही गोष्टींमध्ये त्यांची बरोबरी करू शकत नाही. ते नेहमी सर्वश्रेष्ठ राहतील. मी त्यांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. यानंतर अभिनेते सुनील शेट्टीनेदेखील प्रतिक्रिया दिलीय. त्याने रेड हार्ट इमोजी पोस्ट करून पोस्ट लिहिली. मात्र, नंतर तस्लीमा नसरीन यांनी आपलं ट्विट डिलीट केलं.

Back to top button